Ranji Trophy 2024 MUM vs BDA Anjikya Rahane : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ रणजी करंडक स्पर्धेचे जेतेपद कायम राखण्यासाठी आज मैदानावर उतरला. मुंबईचा पहिलाच सामना बडोदा संघाविरुद्ध कोतांबी स्टेडियमवर सुरू आहे आणि बडोदाने जबरदस्त पुनरागमन करून मुंबईचे टेंशन वाढवले आहे.
प्रथम फलंदाजीला आलेल्या बडोदा संघाला मोहित अवस्थी व शार्दूल ठाकूर यांनी धक्के दिले. शार्दूलने त्याच्या पहिल्याच षटकात बडोदाचा सलामीवीर शिवालिक शर्माचा ( ०) त्रिफळा उडवला. त्यानंतर मोहितने दुसरा सलामीवीर जे के सिंग ( १०) याला माघारी पाठवले. तनुष कोटियन व शाम्स मुलानी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
शाश्वत रावत ( २५), विष्णू सोलंकी ( १८) आणि कर्णधार कृणाल पांड्या ( २१) यांना अपयश आल्याने बडोदा संघाची अवस्था ५ बाद ९० अशी झाली होती. पण, यष्टिरक्षक-फलंदाज मितेश पटेल व ए शेठ यांनी सहाव्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी करून बडोदा संघाला फ्रँटसीटवर बसवले.
दिवसाचा खेळ संपायला १० षटकं शिल्लक असताना ही भागीदारी तोडण्यात मुंबईला यश आले. कर्णधार अजिंक्य रहाणेने स्लीपमध्ये अविश्वसनीय झेल घेतला आणि बडोदाला मोठा धक्का बसला. पटेल १५९ चेंडूंत ८ चौकारांसह ८६ धावांवर मुलानीच्या गोलंदाजीवर बाद झाला. दिसवअखेर बदोडा संघाने ८७ षटकांत ६ बाद २४१ धावा केल्या. शेठ ६० धावांवर खेळतोय आणि राज लिम्बाने १४ धावांवर नाबाद आहे.
मुंबईचा संघ – अजिंक्य रहाणे ( कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, अंगकृष रघुवंशी, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सुयंश शेडगे, हार्दिक तामोरे, सिद्धांत अधात्राव, शॅम्स मुलानी, तनुष कोटियन, हिमांशू सिंग, शार्दूल ठाकूर, मोहित अवस्थी, मोहम्मद जुनेद खान, रोस्टन डाएस,
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.