Mumbai vs Odisha Ranji Trophy 2024-25: मुंबई-त्रिपुरा रणजी ट्रॉफी स्पर्धेतील तिसरा सामना अनिर्णित राहिला. त्यानंतर आज मुंबई ओडिसाविरूद्ध स्पर्धेतील चौथा सामना खेळत आहे. मुंबई संघात पृथ्वी शॉच्या जागी संघात संधी मिळालेल्या अंगक्रिश रघुवंशीने संधीचे सोने केले आणि ९२ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याला मुंबईसाठी संकटमोचकाची भुमिका बजावणाऱ्या सिद्धेश लाडच्या अर्ध शतकीय खेळीची साथ मिळाली. त्याचबरोबर श्रेयस अय्यरच्या दमदार खेळीच्या मदतीने मुंबईने पहिल्याच दिवशी तगडी धावसंख्या उभारली. पण, कर्णधार अजिंक्य रहाणेच्या खात्यात मात्र भोपळा पडला.
मुंबईला बडोद्याविरूद्धच्या पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण, महाराष्ट्राविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात मुंबईने बाजी मारली. त्रिपुराविरूद्धचा तिसरा सामना अनिर्णित राहिला. तर ओडिसाविरूद्धच्या चौथ्या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करत ३ विकेट्स गमावून २४० धावा केल्या आहेत.
मागच्या सामन्यात बेशिस्तपणा आणि आणि वजनाच्या समस्येमुळे सलामीवीर पृथ्वी शॉला संघातून वगळण्यात आले. पृथ्वी शॉच्या जागी २० वर्षीय युवा फलंदाज अंगक्रिश रघुवंशीला संघात स्थान देण्यात आले. त्रिपुराविरूद्धच्या सामन्यात अंगक्रिश आपल्या फलंदाजीने प्रभाव पाडू शकला नाही. त्याने पहिल्या डावात २८ धावा केल्या, तर दुसऱ्या डावात त्याला अवघ्या ६ धावा करता आल्या. परंतु आजच्या सामन्यात त्याने चांगली कामगीरी केली.
सुरूवीतीला अंगक्रिशने मैदानावर स्थिरावण्यासाठी थोडा वेळ घेतला. अशातच त्याचा साथीदार आयुष म्हात्रेने १९ धावांवर त्याची साथ सोडली. आयुष १८ धावा करून पायचीत झाला. त्यानंतर तीसऱ्या क्रमांकावर सिद्धेश लाड फलंदाजीसाठी आला आणि अंगक्रिशने खेळीत वेग पकडला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १४५ धावांची भागीदारी केली.
पुढे ४० व्या षटकात अंगक्रिश त्रिफळाचित झाला आणि अंगक्रिश व सिद्धेशच्या शतकी भागिदारीला ब्रेक लागला. अंगक्रिश रघुवंशीने १२४ चेंडूत १३ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ९२ धावा केल्या. अवघ्या ८ धावांनी त्याचे शतक हुकले. त्याच्या जागी कर्णधार अजिंक्य रहाणे फलंदाजीसाठी आला पण रहाणेला शून्यावरच माघारी परतावे लागले.
पुढे सिद्धेशला साथ देण्यासाठी श्रेयस अय्यर फलंदाजीसाठी आणि दोघांनी पुन्हा एकदा मोठी भागिदारी उभारली एका बाजूने सिद्धेश लाड संथ खेळी खेळत आहे. तर दुसऱ्या बाजूने अय्यर धमाकेदार फटकेबाजी करत आहे. सिद्धेश लाड (७२) व श्रेयस अय्यर (५६) धावांच्या खेळीसह मुंबईने दुपारच्या सत्रापर्यंत २४० धावा उभारल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.