Ranji Trophy 2024: श्रेयसच्या द्विशतकाने मुंबई भक्कम, पण दुसरीकडे महाराष्ट्राची पडझड

Ranji Trophy 2024-25: रणजी ट्रॉफी स्पर्धेत दुसऱ्या दिवसाअंती ओडिसाविरूद्धच्या सामन्यात मुंबई धावांनी ४५६ आघाडीवर आहे. तर सर्विसेस विरूद्धच्या सामन्यात महाराष्ट्र १२३ धावांनी पिछाडीवर गेला आहे.
Shreyas iyer
Shreyas iyeresakal
Updated on

Mumbai vs Odisha And Maharashtra vs Services: रणजी ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेचा दुसरा दिवस मुंबईच्या श्रेयस अय्यर व सिद्धेश लाडने गाजवला. स्पर्धेमध्ये मुंबई आपला चौथा सामना ओडिसाविरूद्ध खेळत आहे. श्रेयस अय्यरच्या द्विशतकी व सिद्धेश लाडच्या दीडशतकी खेळीच्या मदतीने मुंबई दिवस समाप्तीनंतर सामन्यात ४५६ धावांनी आघाडीवर आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र आपला चौथा सामना सर्विसेस विरूद्ध खेळत आहे. महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारत 'अ' संघाचे नेतृत्व करत असल्यामुळे अंकित बावणेवर महाराष्ट्र संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अंकितच्या नेतृत्वात दुसऱ्या दिवसाअंती महाराष्ट्र १२३ धावांनी पिछाडीवर गेला आहे.

मुबंईच्या फलंदाजांनी पहिल्या डावात ओडिसाच्या गोलंदाजांना तुफान झोडपले. मुंबईने दुपारच्या सत्रात पहिला डाव ४ बाद ६०२ धावांवर जाहीर केला. ज्यामध्ये अजिंक्य रहाणे (0) व आयुष म्हात्रे (१८) बाद झाले. पण, मुंबईच्या इतर ४ फलंदाजांनी ओडिसाच्या गोलंदाजीला हैरान करून सोडले. सलामीवीर अंगक्रिश रघुवंशीने ९२ धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरने २३३ धावा करत विक्रमीय द्विशतक लगावले. तर सिद्धेश लाड १६९ धावांसह द्विशतकाच्या जवळ असताना व सुर्यांश शेडगे ७९ धावांसह शतकाच्या जवळ असताना मुंबईने डाव घोषित केला आणि ओडिसाला फलंदाजीसाठी बोलावले.

Shreyas iyer
33 balls 150 runs! श्रेयस अय्यरची तुफान फटकेबाजी; रोहित शर्माने १४ वर्षापूर्वी नोंदवलेला विक्रम मोडला

मुंबईच्या गोलंदाजांनी दिवसाअंतीपर्यंत १४५ धावांवर आडिसाचे ५ विकेट्स घेतले. ज्यापैकी ३ फलंदाज शून्यावर परतले. सलामीवीर अनुराग सारंगीने ३९ व कार्तिक बिस्वाल १४ धावांचे योगदान दिले. तर संदीप पटनाईक ७३ धावांवर व देबब्रत प्रधान ७ धावांवर नाबाद आहेत. दुसऱ्या दिवसाच्या समाप्तीनंतर मुंबई सामन्यात ४५६ धावांनी आघाडीवर आहे.

दुसरीकडे महाराष्ट्रविरूद्ध सर्विसेस अशा लढतीत महाराष्ट्राने सर्विसेसचा पहिला डाव २३९ धावांवर रोखला. सर्विसेसच्या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतकीय कामगीरी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १२८ धावांची मोठी भागीदारी केली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या नितीन कुमारने अवघ्या ५ धावा केल्या. पण, पुन्हा चौथ्या व पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या रवी चौहान (५९) व रजत पालीवाल (५७) यांनी अर्धशतके लगावली. पण त्यानंतरचे ५ फलंदाज पाठोपाठ माघारी परतले, ज्यामध्ये ३ फलंदाज शून्यावर बाद झाले. या डावात महराष्ट्राच्या हितेश वलुंजने सर्विसेसचे ५ विकेट्स घेतले.

Shreyas iyer
Shreyas Iyer चे द्विशतक! BCCI अन् KKR ला करारा जवाब; सिद्धेश लाडसोबत विक्रमी ३०० धावांची भागीदारी

प्रत्युत्तरात उतरलेल्या महाराष्ट्राचा डाव लवकर ढासळला. महाराष्ट्राने पहिल्या डावात सर्वबाद अवघ्या १८५ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये कर्णधार अंकित बावणेने (७३) अर्धशतकीय खेळी केली. पण महाराष्ट्राच्या इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. दिवस संपायच्या आधिच सर्विसेसने महाराष्ट्राचा डाव गुंडाळला. सर्विसेसच्या अमित शुक्लाला माहराष्ट्राचे ७ विकेट्स घेण्यात यश आले. तर, पुलकित नारंगने ३ विकेट्ल घेतले.

सर्विसेसच्या दुसऱ्या डावाला सुरूवात झाली असून दिवसाअखेरीस १५ धावा करत सामन्यात १२३ धावांची आघाडी घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.