Ranji Trophy 2024: अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर अपयशी; गत विजेत्या मुंबईला पहिल्या डावात पिछाडी

Mumbai vs Baroda: रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई संघ पहिल्याच सामन्यात संघर्ष करताना दिसला असून कर्णधार अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर या अनुभवी खेळाडूंनाही मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही.
Ajinkya Rahane - Shreyas Iyer | Ranji Trophy 2024
Ajinkya Rahane - Shreyas Iyer | Ranji Trophy 2024X/BCCIDomestic
Updated on

Ranji Trophy 2024, Mumbai vs Baroda: कर्णधार अजिंक्य रहाणे (२९ धावा), श्रेयस अय्यर (०) या स्टार खेळाडूंच्या अपयशाचा फटका मुंबई क्रिकेट संघाला रणजी क्रिकेट करंडकातील सलामीच्या लढतीत बसला. बडोदे संघाचा पहिला डाव २९० धावांवर आटोपल्यानंतर मुंबईला पहिल्या डावात मोठी मजल मारता आली नाही.

गतविजेत्या मुंबईला २१४ धावांपर्यंतच मजल मारता आली. बडोदे संघाने दुसऱ्या डावात बिनबाद नऊ धावा केल्या असून आता त्यांचा संघ ८५ धावांनी पुढे आहे.

बडोदे संघाने शनिवारी सहा बाद २४१ या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली. शम्स मुलानीने अतित शेठ याला ६६ धावांवर पायचीत बाद केले आणि मोठा अडसर दूर केला.

त्यानंतर बडोदेच्या तळाच्या फलंदाजांना अपयशाचा सामना करावा लागला. बडोदेला पहिल्या डावात २९० धावाच करता आल्या. मुंबईकडून तनुष कोटियनने ६१ धावा देत चार फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. शम्स मुलानीने १११ धावा देत तीन फलंदाज बाद केले.

Ajinkya Rahane - Shreyas Iyer | Ranji Trophy 2024
Ranji Trophy 2024: जम्मू-काश्मीरने उभारल्या ५१९ धावा, पण महाराष्ट्राला शून्यावरच मिळाला पहिला धक्का

मुंबईच्या पहिल्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. कृणाल पंड्याच्या गोलंदाजीवर पृथ्वी शॉ बाद झाला. त्याने २७ चेंडूंमध्ये सात धावा केल्या. तो त्रिफळाचीत बाद झाला. त्यानंतर आयुष म्हात्रे व हार्दिक तामोरे या जोडीने ६३ धावांची भागीदारी केली. भार्गव भटने आयुष म्हात्रेला बाद करीत मुंबईला दुसरा धक्का दिला. त्याने पाच चौकार व एक षटकारासह ५२ धावांची खेळी केली.

५७ धावांची भागीदारी

आयुष म्हात्रे बाद झाल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे व हार्दिक तामोरे या जोडीने ५७ धावांची भागीदारी केली. ही जोडी स्थिरावणार असे वाटत असतानाच महेश पिठीया याने हार्दिक तामोरे याला ४० धावांवर बाद केले. मुंबईने तिसरी विकेट गमावली.

दोन धावांत तीन फलंदाज बाद

मुंबईने दोन धावांमध्ये तीन फलंदाज गमावले. येथूनच मुंबईच्या डावाला खिंडार पडले. दोन १४० धावा अशा स्थितीत असलेल्या मुंबईला याच धावसंख्येवर महेश पिठीयाने हार्दिक तामोरेच्या रूपात धक्का दिला.

Ajinkya Rahane - Shreyas Iyer | Ranji Trophy 2024
Ranji Trophy: नाशिकमध्ये 7 वर्षांनंतर होणार रणजीचे सामने! महाराष्ट्र-वडोदरामध्ये जानेवारीत लढत; नायडू करंडक स्पर्धा नोव्‍हेंबरमध्ये

त्यानंतर भार्गव भटने अजिंक्य रहाणे (२९ धावा) व श्रेयस अय्यर (०) या दोघांनाही बाद करीत मुंबईचा पाय खोलात नेला. दोन बाद १४० या धावसंख्येवरून मुंबईची अवस्था पाच बाद १४१ धावा अशी झाली.

त्यानंतर शम्स मुलानीने १६ धावांची आणि शार्दुल ठाकूरने २७ धावांची खेळी केली; मात्र मुंबईला २१४ धावांपर्यंतच मजल मारता आली. बडोद्याकडून भार्गव भटने ५३ धावा देत चार फलंदाज बाद केले. बडोदे संघाने दुसऱ्या डावात बिनबाद नऊ धावा केल्या आहेत.

संक्षिप्त धावफलक :

बडोदे - पहिला डाव सर्व बाद २९० धावा (मितेश पटेल ८६, अतित शेठ ६६, राज लिम्बानी ३०, तनुष कोटियन ४/६१, शम्स मुलानी ३/१११, शार्दुल ठाकूर २/४९) आणि दुसरा डाव बिनबाद ९ धावा (ज्योत्सनील सिंग खेळत आहे ३, राज लिम्बानी खेळत आहे २)

वि. मुंबई - पहिला डाव सर्व बाद २१४ धावा (पृथ्वी शॉ ७, आयुष म्हात्रे ५२, हार्दिक तामोरे ४०, अजिंक्य रहाणे २९, श्रेयस अय्यर ०, शम्स मुलानी १६, शार्दुल ठाकूर २७, मोहित अवस्थी १४, भार्गव भट ४/५३, आकाश सिंग ३/१९, महेश पिठीया २/५५).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.