MUM vs MAH : मुंबईकर जोरात, प्रतिस्पर्धी कोमात! सर्फराजनंतर आणखी एकाची शतकी खेळी, Ayush Mhatreचे द्विशतक हुकले

Mumbai vs Maharashtra Ranji Trophy 2024 : भारत-न्यूझीलंड कसोटीत सर्फराज खानने शतकी खेळी करून यजमानांना फ्रंटसीटवर बसवले आहे. त्यात मुंबईकर फलंदाज रणजी करंडक गाजवत आहेत.
shreyasiyer
shreyasiyeresakal
Updated on

Mum vs MAH Ranji Trophy 2024 Shreyas Iyer : मुंबईने रणजी करंडक स्पर्धेत महाराष्ट्र संघाविरुद्ध मजबूत पकड घेतली आहे. १७ वर्षीय फलंदाज आयुष म्हात्रेने संघाला मजबूत स्थितीत आणले आणि त्यानंतर आज श्रेयस अय्यरने शतक झळकावले. अय्यरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तीन वर्षानंतर पहिले शतक झळकावले. महाराष्ट्राचा पहिला डाव १२६ धावांवर गुंडाळल्यानंतर मुंबईने दुसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत ४ बाद ३३५ धावा करून २०९ धावांची आघाडी घेतली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.