Ranji Trophy 2024: फिटनेस अन् बेशिस्तपणा? Prithvi Shaw ला मुंबई संघातून का काढून टाकलं

Ranji Trophy 2024: महाराष्ट्राविरूद्धच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर मुंबई रणजी ट्रॉफी स्पर्धेतील आपला तिसरा सामना त्रिपुराविरूद्ध खेळणार आहे.
prithvi shaw
prithvi shawesakal
Updated on

Prithvi Shaw Dropped From Mumbai Squad : मुंबईने रणजी ट्रॉफी स्पर्धेतील बडोद्याविरूद्धचा पहिला सामना गमावला. पण, महाराष्ट्राविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात मुंबईने पुनरागमन करत विजय मिळवला. मुंबई आपला पुढील सामना २६ ऑक्टोबर रोजी त्रिपुराविरूद्ध तिसरा सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी मुंबई संघातून सालामीवीर पृथ्वी श्वॉला वगळण्यात आले आहे. पृथ्वी श्वॉला संघातून वगळण्याचे मुख्य कारण समोर आले नाही. पण, त्याची तंदुरूस्ती आणि शिस्तीबाबत प्रशिक्षक नाराज असल्यामुळे त्याला संघातून वगळण्यात येत असल्याचे सुत्रांमार्फत कळत आहे.

काही अहवालांनुसार, पृथ्वीची संघातील शिस्त मुंबई संघासाठी डोकेदुखी बनली आहे. पृथ्वी खेळाला आणि सरवाला कधीच गांभिर्याने घेत नाही. तो अनेक नेट प्रॅक्टिस सेशन्ससाठी अनुपस्थीत असतो. तो तुंदुरूस्तीबरोबरच खेळातील शिस्तीकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने त्याला पुढील सामन्यासाठी विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.

prithvi shaw
मुंबईने महाराष्ट्रावर दणदणीत विजय मिळवला, पण Bonus Point गमावला; जाणून घ्या Ranji Trophy Points System

भारतीय क्रिकेटपटू श्रेयश अय्यर, शार्दुल ठाकूर व कर्णधार अजिंक्य रहाणेनेही पृथ्वी सरावासाठी सातत्याने येत नसल्याचे सांगितले. पृथ्वीला मागील काही सामन्यांमध्ये फारशे चांगले यश मिळवता नाही. तरीही पृथ्वी त्याच्या खेळाला गांभिर्याने घेत नसल्याचे दिसून आले. पृथ्वी बडोद्याविरूद्धच्या सामन्यात (७),(१२) वर बाद झाला. तर, महाराष्ट्राविरूद्धच्या सामन्यात (१) व (३९) नाबाद अशी कामगिरी केली. याआधी झालेल्या इराणी कप स्पर्धेमधेही तो लवकर बाद झालेला. त्यामुळे त्याच्या एकंदरीत कामगिरीवर संघ व्यास्थापन नाराज आहे.

prithvi shaw
वन डेमध्ये ४९९ धावा! दोन भारतीय फलंदाजांनी झळकावले द्विशतक, इंग्लंड अन् Prithvi Shaw चा मोडला विक्रम

मुंबईविरूद्ध महाराष्ट्र

नुकत्याच झालेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेतील महाराष्ट्राविरूद्धच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात मुंबईने विजय मिळवला. हा सामना मुंबईने ९ विकेट्सने जिंकला. ज्यामध्ये मुंबईच्या १७ वर्षीय आयुष म्हात्रे व श्रेयश अय्यरने शतक झळकावले. तर महाराष्ट्राकडून कर्णधार ऋतुराज गायकवाड व अंकित बावणेने शतकी खेळी केली. मुंबईचा पुढील सामना त्रिपुराविरूद्ध आहे. तर, महाराष्ट्राची पुढील लढत मेघालयाविरूद्ध होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.