Ranji Trophy 2024 : Shreyas Iyer, सिद्धेश लाडची सॉलिड सेंच्युरी, मुंबईचा संघ ३०० पार

Mumbai vs Odisha Ranji Trophy 2024-25: ओडिसाविरूद्धच्या पहिल्या डावात मुंबईचे फलंदाज श्रेयस अय्यर व सिद्धेश लाडने शतकी खेळी केली आहे.
shreyas iyer
shreyas iyeresakal
Updated on

Shreyas Iyer Century in Mumbai vs Odisha: ओडिसाविरूद्धच्या सामन्यात सलामीवीर अंगक्रिश रघुवंशीचे शतक हुकले. पण, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या सिद्धेश लाड व श्रेयस अय्यरने दमदार शतक ठोकले. श्रेयश अय्यरने १०१ चेंडूत १०० धावांची खेळी केली तर सिद्धेशने १९५ चेंडूत शतक लगावले. दोघांनी शतकी खेळी करत मुंबईची धावसंख्या ३०० पार घेऊन गेले आहेत, ज्यामधे अंगक्रिश रघुवंशीच्या ९२ धावांच्या खेळीचेही योगदान आहे.

मुंबईने आयुष म्हात्रेच्या (१८) रूपाने पहिला विकेट १९ धावांवर गमावला. सलामीवीर पृथ्वी शॉच्या जागी संघात आलेल्या अंगक्रिश रघुवंनेला पदार्पणाच्या सामन्यात काही खास कामगिरी केली नाही. पण, या सामन्यात त्याने शतकापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. त्याने १२४ चेंडूत ९२ धावांची धमाकेदार खेळी केली. अंगक्रिश आणि सिद्धेश लाडच्या जोडीने मुंबईच्या खेळीला वेग मिळवून दिला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १४५ धावांची भागीदारी केली. ४० व्या षटकात अंगक्रिश बाद झाला आणि त्याला ८ धावांनी शतकापासून वंचित राहावे लागले. त्यानंतर अजिंक्यही शून्यावर माघारी परतला.

shreyas iyer
Ranji Trophy 2024: मुंबईच्या सलामीवीराचे शतक हुकले, श्रेयस-सिद्धेशची फिफ्टी, Ajinkya Rahane च्या खात्यात भोपळा

पुढे सिद्धेशने श्रेयस अय्यरला साथीला घेत पुन्हा एकदा मोठी भागिदारी उभारली. १५४ धावांवर मुंबईचे तीन फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर सिद्धेश-श्रेयस दुहेरी वेगाने धावसंख्या पुढे घेऊन गेले. एका बाजूने श्रेयस दमदार फटकेबाजी करत होता. तर सिद्धेश दुसऱ्या बाजूने सुरक्षित खेळी खेळण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी दोघांनाही शतकी खेळी करण्यात यश आले. श्रेयसने १०१ चेंडूत जलद शतक ठोकले. तर, सिद्धेशने शतक पुर्ण करण्यसाठी १९५ चेंडू खर्च केले.

मुंबईने पहिल्या दिवसाअंतीपर्यंत ३ विकेट्स गमावत ३८५ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये श्रेयस अय्यर १८ चौकार व ४ षटकारांसह १५२ धावांवर खेळत आहे. तर सिद्धेश लाड १४ चौकारांसह ११६ धावांवर खेळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.