Tripura vs Baroda Ranji Trophy 2024-25: रणजी ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात बडोद्याविरूद्ध मुंबईला पराभवाचा सामना करायला लागला होता. तर, तिसऱ्या सामन्यात मुंबईविरूद्ध पराभूत झालेला त्रिपुरा संघ रणजी ट्रॉफी स्पर्धेतील चौथा सामना बडोद्याविरूद्ध खेळत आहे. या सामन्यात मुंबईकर यशस्वी जैस्वाला मोठा भाऊ तेजस्वी जैस्वालने त्रिपुरा संघाकडूने खेळताना दमदार खेळी केली. त्याचे शतक अवघ्या काही धावांनी हुकले. बडोद्याच्या २३५ धावांच्या प्रत्युत्तरात त्रिपुराने ४८२ धावा केल्या आणि सामन्यात २४७ धावांची मोठी आघाडी घेतली. ज्यामध्ये त्रिपुराच्या ५ खेळाडूंनी अर्धशतकीय खेळी केली.
प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बडोद्याने अवघ्या ४ धावांवर २ विकेट्स गमावले. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी ज्योत्स्निल सिंगने व अतित शेठने १०८ धावांची भागीदारी केली. पुढे ज्योत्स्निल सिंग ४६ धावांवर बाद झाला आणि त्याचे अर्धशतक ४ धावांनी हुकले. तर, ५७ व्या षटकात अतित अर्धशतकीय खेळी करून मघारी परतला. अतितने १३६ चेंडूत ७८ धावांची खेळी केली. त्यानंतर बडोद्याचा डाव घसरण्यास सुरूवात झाली. ७ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या मितेश पटेलने बडोद्याचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण तो अर्धशतकापासून १ धाव दूर असताना त्रिफळाचित झाला. त्यानंततर बडोद्याने सर्वाबाद २३५ धावांपर्यंत मजल मारली.
प्रत्युत्तरात त्रिपुराच्या आघाडी फलंदाजांनी तुफान फटकेबाजी करत सामन्यात मोठी आघाडी घेतली. त्रिपुरच्या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी तब्बल १४८ धावांची भागीदारी केली. ४०व्या षटकात सुरूवातीपासून आक्रमक फलंदाजी करणारा सलामीवीर बिक्रमकुमार दास पायचित झाला आणि त्याचे शतक ३ धावांनी हुकले. त्यानंतर सलामीवीर जीवनजोत सिंग आणि तेजस्वी जैस्वालने पुन्हा मोठी भागिदारी उभारली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १३७ धावांची शतकी भागीदारी केली. पण जीवनजोत सिंग शतकापासून केवळ ६ धांवांनी वंचित राहीला.
त्यानंतर तेजस्वी आणि श्रीदम पौलमध्ये पुन्हा ११६ धावांची मोठी भागीदारी पहायला मिळाली आणि तेजस्वी जैस्वालचेही शतक हुकले. तेजस जैस्वालने १२ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ८२ धावांची खेळी केली. पुढे श्रीदम पौलने ७३ धावांचे, तर मनदीप सिंगने ७४ धावांचे योगदान दिले. त्रिपुराने ७ बाद ४८२ धावा असताना डाव घोषित केला आणि बडोद्याला फलंदाजीसाठी बोलावले. बडोद्याने दिवसाअंतीपर्यंत दुसऱ्या डावात ३७ धावा केल्या. त्रिपुरा तिसऱ्या दिवसाअंती सामन्यामध्ये २१० धावांनी आघाडीवर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.