Mumbai Vs Vidarbha Ranji Trophy Final : एकीकडे टीम इंडियाची इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका शनिवारी संपली आणि यजमानांनी धरमशाला येथे पाच सामन्यांची मालिका 4-1 अशी एक डाव आणि 64 धावांनी जिंकली. दुसरीकडे मुंबईत रणजी ट्रॉफीची फायनल सुरू झाली आहे. यादरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यावर लक्ष ठेऊन आहे आणि मुंबई फलंदाजांनी केलेल्या बेजबाबदार फलंदाजीवर नाराजीही व्यक्त केली.
दूरचित्रवाणीवर सामना पहात असल्याचे छायाचित्र सचिनने एक्सवर पोस्ट केले आहे. आणि त्यात मुंबई फलंदाजांवर भाष्य करताना विदर्भच्या गोलंदाजीचेही कौतूक केले. मुंबईच्या फलंदाजांनी अतिशय सामान्य अशी फलंदाजी केली त्याच वेळी विदर्भच्या गोलंदाजांनी साधे सोपे क्रिकेट खेळून मुंबईच्या फलंदाजांवर दडपण ठेवले. या सामन्यात काही चुरशीचा खेळ होत राहिल असे सचिनने म्हटले आहे.
वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर हिरवे गवत दिसत आहे, परंतु खेळ जा पुढे जाईल तसे चेंडू फिरक घेऊ लागतील. मुंबईच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली होती, परंतु त्यानंतर विदर्भने उत्तम गोलंदाजीकरून सामन्यावर पकड मिळवली. पहिले सत्र विदर्भाचे असेही सचिनने म्हटले आहे.
पृथ्वी शॉ आणि भुपेन लालवानी यांच्या ८१ धावांच्या सलामीनंतर मुंबईची ६ बाद १११ अशी दारुण अवस्था झाली होती. यात अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर यांनी बेजबाबदार फटके मारुन गमावेल्या विकेटवर सचिन नाराज झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.