Ranji Trophy Manoj Tiwary : सर काल रात्री काय घेतलं होतं...? मनोज तिवारी आता अंपायर्सच्या हँगओव्हरवर काय बोलला?

Manoj Tiwary Umpire Hangover : मनोज तिवारीने रणजी ट्रॉफीतील अंपायरिंगवर जहरी टीका केली आहे.
 Manoj Tiwary
Manoj Tiwary esakal
Updated on

Ranji Trophy Manoj Tiwary Umpires Standards : बंगालकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 10 हजारपेक्षा जास्त धावा करणाऱ्या मनोज तिवारीने आपली दोन दशकांची दीर्घ कारकीर्द संपवली. त्याने एका आठवड्यापूर्वी ट्विटरवरून निवृत्ती घेत असल्याची पोस्ट लिहिली.

याचबरोबर त्याने देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा रणजी ट्रॉफीमध्ये अनेक गोष्टी चुकीच्या होत असल्याचा आरोप केला होता. याबद्दल त्याने नाराजी देखील व्यक्त केली होती. आता त्याने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना देशांतर्गत क्रिकेटमधील अंपायरिंगवर देखील टीका केली आहे.

 Manoj Tiwary
Abhishek Sharma SRH : सनराइजर्स हैदराबादच्या स्टार खेळाडूला पोलिसांनी पाठवली नोटीस; काय आहे प्रकरण?

तृणमूल काँग्रसचा नेता आणि बंगालचा क्रीडामंत्री मनोज तिवारीने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, रणजी ट्रॉफीबाबत खेळाडूंमध्ये फार उत्सुकता नाही. रणजी ट्रॉफीची क्रेज आता कमी होत आहे. याला अंपायर्सच्या हँगओव्हरपासून छोट्या ड्रेसिंग रूमपर्यंत अनेक कारणं आहेत. आयपीएल आणि करारबद्ध खेळाडू रणजी ट्रॉफीमध्ये या गोष्टींचा सामना करण्यास तयार नाहीत.

दरम्यान, तिवारीला या बाबत बीसीसीआयला काही शिफारस करणार आहात का असे विचारल्यावर तो म्हणाला की, 'नक्कीच मी बीसीसीआयला शिफारस करणार. जर खेळाडूंना डोपिंग टेस्टमधून जावं गालतं तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये अंपायर्सची देखील डोपिंग टेस्ट झाली पाहिजे.

'अनेकवेळा मी अंपायर्सना हँगओव्हरमध्येच मैदानात येताना पाहिलं आहे. अंपायर्स झोपेत मैदानात येतात. या परिस्थितीत ते चांगलं काम कसं करणार.

 Manoj Tiwary
World Table Tennis Championship : भारताचे दोन्ही संघ विजयासह बाद फेरीत ; मनिकाचे संमिश्र यश

मी एकदा अंपायरला विचारलं की सर काल रात्री का घेतलं होतं? त्यावेळी त्याने मला व्हिस्की आवडते असं सांगितले आणि ते हसत होते. बीसीसीआयने प्रत्येक हंगामापूर्वी अंपायर्सच्या पाहण्याच्या आणि ऐकण्याच्या क्षमतेची चाचणी करायला हवी. असंही तो पुढे म्हणाला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.