Rashid Khan Afghanistan T20 league : अफगाणिस्तानचा स्टार अष्टपैलू खेळाडू राशिद खान याने आणखी एक झंझावाती खेळी केली. अफगाणिस्तान ट्वेंटी-२० लीगमध्ये राशिदच्या जोरदार फटकेबाजीने चाहत्यांची मनं जिंकली, परंतु टायगर्स संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. फजलहक फारुकीच्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर अमो शार्क्सने २६ धावांनी हा सामना जिंकला. फारुकीने १३ धावांत पाच विकेट घेत सामन्याचा निकाल फिरवला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या शार्क संघाने निर्धारित १७ षटकांत ३ बाद १६६ धावा केल्या. झुबैद अकबरीने ४५ चेंडूत ८२ धावांची खेळी केली. पावसाच्या व्यत्ययामुळे टायगर्सना १२ षटकांत १३९ धावांचे लक्ष्य मिळाले, परंतु त्यांना ९ बाबद ११२ धावाच करता आल्या. फारुकीने पहिल्याच षटकात दोन विकेट्स घेतल्या.
संघाची ५ बाद २० धावा अशी दयनीय अवस्था झालेली असताना राशिद फलंदाजीला आला आणि त्याने २६ चेंडूत ५३ धावांची खेळी केली. अफगाणिस्तान ट्वेंटी-२० लीगमध्ये त्याने सर्वात जलद अर्धशतक ठोकले. या खेळीत त्याने ३ चौकार आणि ६ षटकार मारले. राशिदने त्याच्या खेळी काही नवीन शॉट्स आणले. त्याने 'नो-लूक' षटकार, 'हेलिकॉप्टर शॉट' असे दणदणीत फटके खेचले.
अफगाणिस्ताच्या अष्टपैलू खेळाडू राशिदने १ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या बिग बॅश लीग २०२४-२५ च्या पर्वातून माघार घेतली आहे. सलग दुसऱ्या वर्षी त्याने BBL मध्ये खेळणार नाही. २०१७मध्ये त्याने एडिलेड स्ट्रायकर्सचे प्रतिनिधित्व केले होते. डिसेंबरम २०१७ मध्ये BBL मधील पदार्पणानंतर त्याने ९८ विकेट्स घेतल्या आहेत. ६९ सामन्यांत त्याची इकॉनॉमी ६.४४ अशी राहिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.