Ravi Bishnoi Injury : थोडक्यात वाचला टीम इंडियाच्या खेळाडूचा डोळा! रक्तबंबाळ प्लेयरला पाहून गौतम झाला 'गंभीर' Video

India vs Sri Lanka 1st T20I : गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षकपदाखाली भारतीय संघाने विजयी सुरुवात केली. श्रीलंकेविरुद्धचा पहिला ट्वेन्टी-२० सामना भारताने ४३ धावांनी जिंकला. सूर्यकुमार यादवनेही आपल्या पूर्णवेळ कर्णधारपदाचा विजयाचे श्रीगणेशा केला.
 Ravi Bishnoi Injury Sri Lanka vs India 1st T20
Ravi Bishnoi Injury Sri Lanka vs India 1st T20sakal
Updated on

India vs Sri Lanka 1st T20I : गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षकपदाखाली भारतीय संघाने विजयी सुरुवात केली. श्रीलंकेविरुद्धचा पहिला ट्वेन्टी-२० सामना भारताने ४३ धावांनी जिंकला. सूर्यकुमार यादवनेही आपल्या पूर्णवेळ कर्णधारपदाचा विजयाचे श्रीगणेशा केला.

सूर्यकुमारनेच झळकावलेल्या आक्रमक अर्धशतकामुळे भारताने प्रथम फलंदाजीत ७ बाद २१३ धावा उभारल्या. त्यानंतर श्रीलंकेला १७० धावांत गुंडाळले, पण या सामन्यादरम्यान एक अपघात झाला, त्यात भारतीय गोलंदाज रवी बिश्नोई गंभीर जखमी झाला.

 Ravi Bishnoi Injury Sri Lanka vs India 1st T20
Suryakumar Yadav : विराट कोहलीच्या वर्ल्ड रेकॉर्डवर 'सूर्य' ग्रहण! SKY चा श्रीलंकेविरुद्ध मोठा पराक्रम

रवी बिश्नोईला चेंडू कसा लागला?

खरंतर, रवी बिश्नोई श्रीलंकेच्या डावातील 16 वे षटक टाकत होता. श्रीलंकेचा कामिंडू मेंडिस त्याच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर स्ट्राइकवर होता. बिश्नोईने गुगली बॉल टाकला ज्यावर त्याने समोर चेंडू मारला जो बिश्नोईच्या उजव्या हाताकडे येत होता. अशा स्थितीत बिष्णोईने झेल घेण्यासाठी शानदार डाईव्ह टाकली, पण एका हाताने झेल पकडता आला नाही आणि त्यावेळी चेंडू डाव्या डोळ्याखाली लागला.

बिष्णोईने फक्त झेल सोडला नाही तर त्याचवेळी तो जखमी झाला आणि त्याला खूप त्रास होऊ लागला. बिष्णोईवर उपचार करण्यासाठी फिजिओ तात्काळ मैदानात आले आणि त्यांच्या चेहऱ्यावर पट्टी लावण्यात आली. त्यावेळी भारतीय संघांचा कोच गौतम गंभीर थोडा चिंतेत दिसत होता. ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 Ravi Bishnoi Injury Sri Lanka vs India 1st T20
IND vs SL : 'आम्ही भाग्यवान होतो की...', कर्णधार सूर्याला वाटत होती भीती? मॅच संपल्यानंतर केलं मोठे वक्तव्य

रवी बिश्नोई जखमी झाला पण तरीही त्याने मैदान सोडले नाही. याच षटकात श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंकाची विकेट घेत बिश्नोईने टीम इंडियाला महत्त्वाचे यश मिळवून दिले. बिश्नोईच्या या विकेटनंतर श्रीलंकेची मधली कोसळली. त्यामुळे टीम इंडियाने टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.