'Rishabh Pant ला हॉस्पिटलमध्ये पाहिलं तेव्हा वाटलं परत क्रिकेट...', रवी शास्त्रींनी सांगितली आठवण

Ravi Shastri on Rishabh Pant: कार अपघात झाल्यानंतर काही दिवसांत मी रिषभ पंतला रुग्णालयात भेटायला गेलो होतो. तेव्हा त्याची परिस्थिती पाहून धक्का बसला होता, असं रवी शास्त्रींनी सांगितलं आहे.
Ravi Shastri - Rishabh Pant
Ravi Shastri - Rishabh PantSakal
Updated on

Rishabh Pant car accident: कार अपघात झाल्यानंतर काही दिवसांत मी रिषभ पंतला रुग्णालयात भेटायला गेलो होतो. तेव्हा त्याची परिस्थिती पाहून धक्का बसला होता. तो पुन्हा क्रिकेट खेळेल, असे अजिबात वाटले नव्हते; परंतु त्याचे पुन्हा मैदानावर येणे हा चमत्कारच आहे, असे मत माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.

पंतच्या गाडीला झालेला जीवघेणा अपघात, पायाला, गुडघ्याला झालेल्या गंभीर दुखापती यानंतर त्याचे जीवन म्हणजे पूर्नजन्मच असल्याचे सांगतात; परंतु जिगरबाज पंतने कठोर मेहनत घेत तेवढ्या जोरदारपणे आंतरराष्ट्रीय पुनरागमन केले आणि जणू काही ती घटना घडलीच नाही, अशा पूर्वीच्या थाटात तो तेवढीच आक्रमक फलंदाजीही आणि यष्टीरक्षणही करत आहे.

Ravi Shastri - Rishabh Pant
IND vs AUS: रिकी पाँटिंगच्या ३-१ अशा दाव्याची Ravi Shastri यांनी काढली हवा; म्हणाले, पुन्हा घरात घुसून...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.