Ashwin buys team in Global Chess League : रविचंद्रन अश्विनची गणना जगातील स्टार फिरकीपटूंमध्ये केली जाते. त्याने एकट्याने भारतीय संघासाठी अनेक सामने जिंकले आहेत आणि त्याचा कॅरम बॉल समजून घेणे महान फलंदाजासाठीही सोपे नाही. अश्विन आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून क्रिकेट खेळतो. दरम्यान, अश्विन ग्लोबल चेस लीगमधील अमेरिकन गॅम्बिट्स संघाचा सह-मालक बनल्याची मोठी बातमी समोर आली आहे.
ग्लोबल चेस लीगचा पहिला हंगाम 2023 मध्ये खेळला गेला होता. आता त्याचे दुसरे वर्ष 2024 मध्ये होणार आहे. यामध्ये रविचंद्रन अश्विनने टीम विकत घेतले आहे. अमेरिकन गॅम्बिट्स संघ सहभागी होणार आहे, जो दुसऱ्या सत्रात सहभागी होणारा सर्वात नवीन संघ आहे.
GCL ही टेक महिंद्रा आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ यांच्या संयुक्त मालकीची लीग आहे. प्रसिद्ध उद्योगपती प्रचूर पीपी, व्यंकट के नारायण आणि अश्विन यांच्या मालकीचे अमेरिकन गॅम्बिट्स या स्पर्धेत चिंगारी गल्फ टायटन्सची जागा घेतील. लीगचा दुसरा हंगाम 3 ते 12 ऑक्टोबर दरम्यान लंडनमध्ये खेळवला जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.