Ravichandran Ashwin : इंग्लंडविरुद्ध राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात 500 कसोटी बळी पूर्ण करणारा भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन अचानक घरी परतला होता. बीसीसीआयने अश्विनबद्दल एवढेच सांगितले होते की, काही कौटुंबिक आपत्कालीन परिस्थितीमुळे अश्विनला घरी जावे लागले.
मात्र, त्यावेळी अश्विनच्या घरात कोणती समस्या निर्माण झाली होती, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. अश्विन एका रात्रीत घरी परतला होता. त्यानंतर तो सामना खेळण्यासाठी पुन्हा राजकोटमध्ये आला होता. आता अश्विनची पत्नी प्रीतीने त्या दिवशी काय झालं याचा उलगडा केला आहे. अश्विन धरमशालामध्ये आपला 100 वा कसोटी सामना खेळणार आहे.
अश्विन अचानक कसोटी सामना सोडून घरी परतण्याच्या घटनेला तब्बल 15 उलटल्यानंतर अश्विनची पत्नी प्रीतीने या बाबतची संपूर्ण माहिती सोशल मीडियावर शेअर केली. तिने सांगितले की, अश्विनची आई त्या दिवशी घरी पडली होती आणि त्यामुळेच अश्विनला रात्री चेन्नईला जावे लागले. या घटनेनंतर अश्विननेही याबाबत मीडियाला काहीही सांगितले नाही.
इंडियन एक्स्प्रेसमधील तिच्या कॉलममध्ये अश्विनची पत्नी प्रीतीने सांगितले आहे की, अश्विनची आई अचानक पडल्या होत्या, त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्य त्यांना रुग्णालयात घेऊन गेले. या घटनेनंतर प्रीतीने अश्विनला थेट फोन करण्याऐवजी चेतेश्वर पुजाराला फोन केला. प्रीतीने सांगितले की, सामन्यादरम्यान, जेव्हा तिने (अश्विन) 500वी विकेट घेतली तेव्हा मुले शाळेतून घरी परतली होती. आम्ही फोनवर सगळ्यांच्या अभिनंदनाच्या मेसेजला रिप्लाय देत होतो तेव्हा अचानक आई पडल्याचा आवाज आला.
प्रीतीने भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांचेही आभार व्यक्त केले. त्यांनी अश्विनचा मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा केला. सर्वांच्या सहकार्याने अश्विन रात्री उशिरा आमच्यापर्यंत पोहोचला. अश्विन घरी परतल्यावर आईंना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. मात्र आईंनी स्वतः अश्विनला दुसऱ्या दिवशी परत जाण्यासाठी मनवले. प्रितीने सांगितले की, आईने अश्विनला सामन्यासाठी संघात परतण्यास सांगितले होते, परंतु अश्विनला आईसोबत वेळ घालवायचा होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.