R ashwin
R ashwinesakal

आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले अन्...! R Ashwin शतकी खेळीनंतर काय म्हणाला ते वाचा

R Ashwin century in IND vs BAN test match: बांगलादेशविरूद्ध पहिल्या कसोटी सामन्यात अश्विनने १३३ चेंडूत १३३ धावांची शतकीय खेळी केली.
Published on

Ravichandran Ashwin: भारताचा अष्टपैलू खेळाडू आर अश्विनने बांगलादेशविरूद्ध पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावले. या डावामध्ये अश्विनने १३३ चेंडूत १३३ धावांची खेळी केली. तर अश्विन व जडेजाच्या जोडीने १९९ धावांची भागीदारी केली. संघाला सावऱ्या या खेळीबद्दल अश्विनने सखोल माहिती दिली.

"जडेजा समोर असतो तेव्हा मलाही छान वाटते. आमच्यात एक चांगले नाते आहे. जडेजा खूप गुणवान खेळाडू आहे, ज्याला क्रिकेटचे तीनही अंग म्हणजे फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तीनही मस्त येते, ज्याचा मला हेवा वाटतो. मी त्याच्याकडून खूप काही शिकलो आहे," असे मत शतकवीर अश्विनने व्यक्त केले.

R ashwin
पोरांनो माझ्या बॉलिंग स्टाईलची कॉपी नका करू...! Jasprit Bumrah ने का केलं असं आवाहन?

"पहिले सहा फलंदाज बाद झाले असताना दडपणाखाली मला फलंदाजीला जावे लागले, पण मला दडपण खूप आवडते. एकाग्रता राखायला आणि माझ्यातील सर्वोत्तम खेळ बाहेर काढायला त्याच दडपणाचा फायदा होतो. फलंदाजीला आल्यापासून मला मस्त वाटत होते. माझ्या विचारात आणि फटके मारण्यातील समन्वय उत्तम होता. म्हणून मी चांगली फलंदाजी करू शकलो." असे अश्विन म्हणाला.

"काल दुसऱ्या सत्रानंतर खेळपट्टी फलंदाजीला चांगली होती. तरही आश्चर्य म्हणजे चेपॉकच्या खेळपट्टीवर दुसऱ्या दिवशीही वेगवान गोलंदाजांच्या माऱ्याला प्रतिसाद मिळतो आहे. कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी १७ फलंदाज बाद झाले आहेत. मला तरी या गोष्टीची कमाल वाटत आहे. याचाच अर्थ दोनही दिवस वेगवान गोलंदाजांना काही ना काही मदत मिळाली आहे." असे पहिल्या दोन दिवसांतील खेळातील विश्लेषण करताना अश्विन म्हणाला.

R ashwin
IND vs BAN: वेलकम बॅक Rishabh Pant! वादळी शतक पाहून स्टेडियममधील आज्जीही भारावल्या, पाहा Video

"आता खेळपट्टी जरा संथ होत जाते आहे, असे मला वाटते. म्हणून भारतीय संघाने दुसऱ्या डावात जास्त काळ फलंदाजी करून खेळपट्टी थोडी खडबडीत व्हायला वाट बघितली पाहिजे म्हणजे बांगलादेश संघाला दुसऱ्या डावात फलंदाजी करताना अडचण येईल. त्यांच्या फलंदाजीत गुणवत्ता असल्याने आम्ही अजून गोष्टी गृहीत धरत नाही आहोत." असेही अश्विनने स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...