IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Ravindra Jadeja 350 International Wickets at Home: न्यूझीलंड विरुद्ध बंगळुरू कसोटी भारतीय संघाकडून तिसऱ्या दिवशी रविंद्र जडेजाने दोन फलंदाजांना क्लिनबोल्ड करत मोठ्या विक्रमालाही गवसणी घातली आहे.
Ravindra Jadeja | India vs New Zealand 1st test
Ravindra Jadeja | India vs New Zealand 1st testSakal
Updated on

India vs New Zealand 1st Test: न्यूझीलंड क्रिकेट संघाविरुद्ध बंगळुरुला सुरू असलेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला तिसऱ्या दिवशी रविंद्र जडेजाने पुनरागमन करून दिले. पहिल्या दिवशी पावसाचा अडथळा आलेल्या या सामन्यातील खेळाला दुसऱ्या दिवशी सुरुवात झाली.

परंतु, दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा खेळ खराब झाला. भारतीय संघ पहिल्या डावात अवघ्या ४६ धावात सर्वबाद झाला. त्यानंतरही भारताचे क्षेत्ररक्षण फारसे चांगले झाले नव्हते. न्यूझीलंडने ५० षटकात ३ बाद १८० धावा दुसऱ्या दिवस अखेर केल्या होत्या.

मात्र, तिसऱ्या दिवशी सुरुवातीला भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यातही रविंद्र जडेजाने एक मोठा विक्रमही केला.

Ravindra Jadeja | India vs New Zealand 1st test
Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.