Ravindra Jadeja: जड्डूची वनडे कारकीर्दही संपली? कोच गंभीर अन् मॅनेजमेंटचा असा आहे भविष्यातील प्लॅन

India Tour of Sri Lanka: भारतीय संघ जुलै महिन्याच्या अखेरीस श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातील वनडे मालिकेसाठी अष्टपैलू रविंद्र जडेजाला संधी मिळालेली नाही.
Ravindra Jadeja
Ravindra JadejaSakal
Updated on

Ravindra Jadeja Missing from India's ODI Squad for Sri Lanka Series: भारतीय संघाला जुलैच्या अखेरच्या आठवड्यात श्रीलंका दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ३ वनडे आणि ३ टी२० सामने खेळणार आहे या दौऱ्यासाठी गुरुवारी (१८ जुलै) भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, वनडे संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन्ही वरिष्ठ खेळाडूंचा समावेश आहे. मात्र, रविंद्र जडेजाचे नाव वनडे संघात न दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

टी२० वर्ल्ड कप २०२४ विजयानंतर रोहित-विराट यांच्यासह जडेजाने देखील आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, तो वनडे आणि कसोटीसाठी खेळणार असल्याचे त्याने सांगितले होते.

Ravindra Jadeja
Paris Olympic 2024: एकटा वाघ जगाला भारी! ऑलिंपिकच्या इतिहासात भारताने जितके गोल्ड मेडल जिंकलेत त्याच्या डबल 'या' पठ्ठ्याकडे

आता अशी अपडेट समोर येत आहे की नवनिर्वाचीत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या हाताखालील व्यवस्थान पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या दृष्टीकोनातून जडेजाच्या बदली पर्यायांचा विचार करत आहे. मुख्यत: अक्षर पटेल आमि वॉशिंग्टन सुंदर यांचा त्याच्या जागेवर विचार केला जाणार असल्याचे समजत आहे.

जडेजा गेल्या अनेक वर्षांपासून भारताच्या वनडे संघातील मुख्य खेळाडूंपैकी एक आहे.

याबाबत एका सुत्राने हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना सांगितले की 'पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी केवळ सहा वनडे भारताच्या बाकी आहेत, ज्यातील श्रीलंकेविरुद्ध तीन सामने होणार आहेत. निवड समिती अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदरला अधिक संधी देऊन तपासण्याचा प्रयत्न करत आहेत.'

Ravindra Jadeja
Paris Olympic 2024 : मजुरी करून आईने वाढवलं; ऑलिम्पिक गाजवून तिला भेट द्यायचीय! ज्योतीची भावनिक गोष्ट

सुत्राने सांगितले, 'जडेजाच्या कामगिरीमध्ये काही चूक नाही. मात्र संघव्यवस्थापन भविष्यात संघ उभारणीच्या दृष्टीने अन्य पर्यायांचा शोध घेत आहेत.'

'जडेजा कसोटी क्रिकेटमधील अफलातून खेळाडू आहे. त्याची मायदेशातील गोलंदाजीची बरोबरी होऊ शकत नाही. तो भारतासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन स्पर्धेसाठी महत्त्वाचा असेल.'

दरम्यान, जडेजाच्या जागेवर अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा विचार केला जात आहे.

जडेजाने वनडेमध्ये १९७ सामने खेळले असून १३ अर्धशतकांसह २७५६ धावा केल्या आहेत आणि २२० विकेट्स घेतल्या आहेत.

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ

वनडे संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), शुभमन गिल ( उप कर्णधार), विराट कोहली, लोकेश राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलिल अहमद, हर्षित राणा.

टी-२० संघ - सूर्यकुमार यादव ( कर्णधार), शुभमन गिल ( उप कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलिल अहमद, मोहम्मद सिराज.

Crossword Mini:

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.