Ravindra Jadeja च्या कारकीर्दिबाबत मोठे अपडेट्स, दोन कारणं ज्यामुळे त्याला वन डे संघात नाही घेतले

Ravindra Jadeja dropped? श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी निवडलेल्या संघात रवींद्र जडेजाचे नाव नाही
Ravindra Jadeja career ODI
Ravindra Jadeja career ODIsakal
Updated on

Ravindra Jadeja Career over ? भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू फलंदाज रवींद्र जडेजा याची श्रीलंकाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी संघात निवड न झाल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जेतेपदानंतर रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह जडेजानेही आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे आणि त्यासाठी संघांची घोषणा केली गेली. नवीन प्रशिक्षक गौतमच्या विनंतीचा मान राखून रोहित व विराटने वन डे मालिकेत खेळण्याची तयारी दर्शवली. पण, त्याचवेळी सीनियर खेळाडू जडेजा संघाच्या यादीत नसल्याने चर्चेला तोंड फुटले..

रवींद्र जडेजाच्या वन डे कारकीर्दिचा शेवट?

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाची नवी सुरुवात होणार आहे. ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आले आहे. तेच वन डे मालिकेसाठीच्या संघातून जडेजाचे नाव गायब दिसल्याने सर्वांना आश्चर्य वाटले आहे. या मालिकेसाठी विराट व रोहितचा समावेश आहे, तर जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली गेली आहे. २०२५ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने वन डे मालिका महत्त्वाची आहे. अशात जडेजाचे नाव नसल्याने हा त्याच्या कारकीर्दिचा शेवट आहे का, अशी चर्चा रंगली आहे.

Ravindra Jadeja career ODI
WTC Standings : इंग्लंडची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत मोठी झेप; पाकिस्तानची उडवली झोप

दोन कारणं अन् जडेजाला विश्रांती

ESPNCricinfo ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार रवींद्र जडेजाला वगळले गेलेले नाही, तर त्याला विश्रांती दिली गेली आहे. तो भारताचा महत्त्वाचा अष्टपैलू आहे. या मालिकेसाठी वन डे संघात निवड न होण्यामागची दोन कारणं समोर येत आहेत. अक्षर पटेल हा ट्वेंटी-२० प्रमाणेच वन डे क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करतो का, हे गौतम गंभीरला पाहायचे आहे.

रवींद्र जडेजाला कसोटी क्रिकेटसाठी तंदुरुस्त ठेवायचे आहे, हेही एक कारण आहे. भारतीय संघ सप्टेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ मध्ये १० कसोटी सामने खेळणार आहेत. या कालावधीत भारतीय संघ बांगलादेश व न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर, तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिका खेळणार आहे. निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनीही सोमवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत जडेजाला वगळले नसून विश्रांती दिल्याचे स्पष्ट केले.

Ravindra Jadeja career ODI
ना रोहित, ना विराट! बाबर आझमने सर्वोत्तम फलंदाज म्हणून केलेली निवड ऐकून डिव्हिलियर्स चकित

रवींद्र जडेजाची कारकीर्द

रवींद्र जडेजा हा भारताचा तिन्ही फॉरमॅटमधील महत्त्वाचा फिरकी अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने ट्वेंटी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ७४ ट्वेंटी-२०त त्याने ५१५ धावा ५४ विकेट्स घेतल्या आहेत. ७२ कसोटीत ३०३६ धावा व २९४ विकेट्स जडेजाच्या नावावर आहेत. वन डे क्रिकेटमध्ये १९७ सामन्यांत त्याने २७५६ धावा केल्या आहेत, तर २२० विकेट्स घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.