Ravindra Jadeja : खेळपट्टीचा अंदाज बांधणे कठीणच : जडेजा

हे माझे घरचे मैदान असले तरी येथील खेळपट्टीचा अंदाज बांधणे कठीण आहे. तरीही पहिल्या दोन दिवसांच्या खेळात फलंदाजांसाठी उपयुक्त असेल, नंतर फिरकी गोलंदाजांना संधी असेल, असा अंदाज रवींद्र जडेजाने व्यक्त केले.
Ravindra Jadeja
Ravindra Jadeja sakal
Updated on

राजकोट : हे माझे घरचे मैदान असले तरी येथील खेळपट्टीचा अंदाज बांधणे कठीण आहे. तरीही पहिल्या दोन दिवसांच्या खेळात फलंदाजांसाठी उपयुक्त असेल, नंतर फिरकी गोलंदाजांना संधी असेल, असा अंदाज रवींद्र जडेजाने व्यक्त केले. हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू न शकलेला रवींद्र जडेजा आता तंदुरुस्त झाला आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याअगोदर जडेजाने पत्रकारांशी सवांद साधला.

खेळपट्टीबाबत बोलताना जडेजा म्हणाला, इतके क्रिकेट खेळूनही राजकोटच्या खेळपट्टीचा बऱ्‍याच वेळा अचूक अंदाज लागत नाही. कधी इथली खेळपट्टी एकदम पाटा असते की पाच दिवसांत एक डावही पूर्ण होत नाही, तर कधी चेंडू असा काही फिरतो की दोन दिवसांत सामना संपतो. तिसऱ्‍या कसोटी सामन्यासाठी तयार करण्यात आलेली खेळपट्टी मला टणक वाटते. म्हणजेच पहिले किमान दोन दिवस फलंदाजीसाठी चांगली असेल, मग कडक उन्हामुळे कदाचित भेगा पडतील.

Ravindra Jadeja
Ravindra Jadeja Family Dispute : घरातला वाद चव्हाट्यावर आल्यानंतर जडेजाचे 12 वर्षापूर्वीचे ट्विट व्हायरल

इंग्लंडचे फलंदाज विविध फटके मारून भारतीय गोलंदाजांना वेगळेच प्रश्न विचारत आहेत. त्या मुद्द्यांवर बोलताना जडेजा म्हणाला, सगळ्या खेळाडूंना कल्पना आहे की इंग्लंड संघ वेगळ्या आक्रमक विचारांनी खेळतो आहे. त्यांचे फलंदाज सतत आक्रमक फटके मारायच्या पवित्र्यात असतात. मला वाटते त्यांनी बदल केले म्हणून आम्ही गोलंदाजांनी बदल करायला हवे असे नाही. आमच्या योजनांवर ठाम राहून आम्ही मारा करत राहिलो तर यश नक्की मिळेल.

इंग्लंड संघ ताकदवान आहे याची पूर्ण कल्पना आम्हाला आहे. भारतात येऊन भारतीय संघाला कसोटी सामन्यात टक्कर देणे किती कठीण असते ते सगळ्यांना माहीत आहे. तसेच तिसऱ्‍या कसोटीत मैदानात उतरणाऱ्‍या भारतीय फलंदाजीत मधल्या फळीत कसोटी खेळायचा अनुभव कमी असला तरी आपल्या नव्या फलंदाजांनी प्रथम श्रेणीचे भरपूर क्रिकेट खेळले आहे. उलट काही मोठे खेळाडू उपलब्ध नसल्याने त्यांना मोठी संधी मिळते आहे.

४९९ कसोटी बळी घेतलेल्या अश्विनबद्दल जडेजाला वेगळे प्रेम असणे स्वाभाविक आहे. अश्विन ५०० कसोटी बळींच्या उंबरठ्यावर आहे. अश्विनबरोबर एक दशकापेक्षा जास्त काळ मी खेळतो असल्याने आनंद होतो आहे की तो ५०० बळींचा भलामोठा टप्पा पार करणार आहे आणि तेसुद्धा माझ्या गावी. यापेक्षा अजून चांगले काहीच असू शकत नाही, असे म्हणत जडेजाने पत्रकारांचा निरोप घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.