Reason behind Hardik-Natasa separation: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याच्या आयुष्यात घटस्फोटाचं वादळ आलं. इंडियन प्रीमिअर लीग २०२४ सुरू असतानाच हार्दिक व नताशा स्टँकोव्हिच यांच्यातल्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण, त्यावर दोघांनीही भाष्य केले नव्हते. मात्र, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ संपल्यानंतर नताशा व हार्दिक या दोघांनी सोशल मीडियावर आम्ही दोघं विभक्त होत असल्याची घोषणा केली. ता दोघांच्या घटस्फोटामागे ब्रिटीश सिंगर हिच्यासोबतच्या हार्दिकचं अफेअर हे कारण असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण, नेमकं कारण आज समोर आले आहे.
हार्दिकचं नाव ब्रिटीश गायिका जास्वीन वालिया हिच्यासोबत जोडलं जात आहे. ही दोघं ग्रीसमध्ये सोबत फिरायला गेल्याचाही दावा केला गेला. पण, Times Now ने दिलेल्या वृत्तानुसार नताशाला हार्दिकच्या फ्लॅमबॉय पर्सनॅलिटीशी जुळवून घेता आले नाही. ज्यामुळे या दोघांच्या वैवाहिक आयुष्यात बरेच खटके उडाले. ''हार्दिकचं वागणं दिखाऊ झालं होतं आणि तो स्वतःमध्येच रमलेला होता. नताशाला आता ते सांभाळता आले नाही. तिला जाणवले की तो कसा होता आणि आता कसा आहे, यात बरंच अंतर निर्माण झाले आहे. तिने त्याच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु यामुळे तिला अस्वस्थ वाटू लागले. ही कधीही न संपणारी प्रक्रिया होती, त्यामुळे काही काळानंतर हे तिला थकवणारे झाले. म्हणून, तिने एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतला,” असे एका सूत्राने TN ला सांगितले.
"खूप विचार करूनही तिने तिचा निर्णय बदलला नाही. तिच्यासाठी हा अत्यंत क्लेशदायक निर्णय होता, पण तो एका दिवसात किंवा एका आठवड्यात झाला नाही. हे एक दुखणं झालेलं, जी तिला सतत खूपत होती,” असेही सूत्रांनी सांगितले.
नताशा आणि मुलगा अगस्त्य सध्या सर्बियामध्ये आहेत. तिने मुलासह सर्बियाला स्थलांतर केले आहे. विभक्त होण्याच्या घोषणेच्या एक दिवस आधी नताशा भारताबाहेर गेली. दुसरीकडे, टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हा कथित गर्लफ्रेंड जास्मिन वालियासह ग्रीसमध्ये सुट्टी घालवत असल्याची अफवा आहे.
पांड्या आणि स्टँकोव्हिच हे मुंबईच्या नाईट क्लबमध्ये भेटले होते आणि त्यांनी २०१८ मध्ये डेटिंग सुरू केली. २०२० मध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एका यॉटवर पांड्याने तिला प्रपोज केले आणि मे २०२० मध्ये कोविड-१९ दरम्यान घरच्यांचा उपस्थितीत लग्न केलं होतं. त्यानंतर जुलै २०२०मध्ये अगस्त्यचा जन्म झाला. २०२३ मध्ये या दोघांनी उदयपूरमध्ये एका भव्य समारंभात पुन्हा लग्नगाठ बांधली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.