Duleep Trophy 2024-25 Team : आगामी कसोटी मालिका लक्षात घेता निवड समिती आणि BCCI ने प्रमुख खेळाडूंना देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळण्याचा सल्ला दिला होता. राष्ट्रीय कर्तव्य नसताना खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळायला हवे, ही बीसीसीआयची अपेक्षा आहे. त्यामुळेच सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन यांनी बूची बाबू क्रिकेट स्पर्धेत खेळण्याची इच्छा व्यक्त केली. त्याचबरोबर ५ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील ४ संघांत कोणकोण सीनियर खेळाडू खेळतात याची उत्सुकता होती. BCCI ने बुधवारी या स्पर्धेसाठीच्या चार संघांची घोषणा केली आणि त्यात रोहित शर्मा व विराट कोहलीसह जसप्रीत बुमराह आदी सीनियर खेळाडूंची नावे मिसिंग दिसली...
अ संघ - शुभमन गिल ( कर्णधार), मयांक अग्रवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, लोकेश राहुल, तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, विद्वत कवेरप्पा, कुमार कुशाग्रा , शास्वत रावत.
ब संघ - अभिमन्यू ईश्वरन ( कर्णधार), यशस्वी जैस्वाल, सर्फराज खान, ऋषभ पंत, मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चहर, आर साई किशोर, मोहित अवस्थी , एन जगदीसन.
क संघ- ऋतुराज गायकवाड ( कर्णधार ), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल, सूर्यकुमार यादव, बाबा इंद्रजित, हृतिक शोकीन, मानव सुथार, उम्रान मलिक, विश्यक विजयकुमार, अंशुल कंबोज, हिमांशू चौहान, मयांक मार्कंडे, आर्यन जुयाल, संदीप वॉरियर
ड संघ - श्रेयस अय्यर ( कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिक्कल, इशान किशन, रिकी भुई, सरांश जैन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, तुषार देशपांडे, आकाश सेनगुप्ता, केएस भरत, सौरभ कुमार.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कसोटी संघातील खेळाडूंना राष्ट्रीय कर्तव्यावर नसताना देशांतर्गत क्रिकेट खेळायलाल सांगितले होते. पण, त्यांनी या नियमात रोहित शर्मा, विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना सूट दिली होती. बांगलादेश आणि न्यूझीलंड कसोटी मालिकेपूर्वी ऑगस्टमध्ये कसोटी खेळाडूंनी दुलीप ट्रॉफीचा सामना खेळला पाहिजे, असे BCCI चे म्हणणे होते. पण, रोहित, विराट व जसप्रीत यांनी खेळायचे की नाही, हा निर्णय BCCI ने त्यांच्यावर सोडला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.