Australia vs India Test: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला सुरुवातीलाच खेळाडूंच्या दुखापतींच्या समस्येला सामोरे जावे लागले आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ही ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.
पर्थमध्ये २२ नोव्हेंबर पासून या कसोटी मालिकेला सुरुवात होईल. या मालिकेसाठी भारतीय संघ जोरदार सराव करताना दिसत आहे. भारतीय खेळाडूंनी भारत अ संघाविरुद्ध सराव सामनाही खेळला. मात्र या सराव सामन्यादरम्यान भारताचे दोन खेळाडू दुखापतग्रस्त झाले. हे दोन खेळाडू म्हणडे केएल राहुल आणि शुभमन गिल.