Irani Cup: पृथ्वी शॉ लढला, पण मुंबईचा डाव घसरला

Mumbai vs Rest of India: शेष भारत संघाचा पहिला डाव आज ४१६ धावांवर संपुष्टात आला. तर मुंबईने दुसऱ्या डावात चौथ्या दिवसाअखेरीस १५३ धावा केल्या आहेत.
prithvi shaw
prithvi shawesakal
Updated on

Mumbai vs Rest of India: मुंबईच्या प्रत्युत्तरात उतरलेल्या शेष भारत संघाचा डाव ४१६ धावांवर आटपला. तर मुंबईचा दुसरा डाव सुरू झाला असून दुसऱ्या डावत मुंबईचा सलामीवीर पृथ्वी शॉने धमाकेदार फलंदाजी केली. परंतु मुंबईच्या इतर आघाडीचे खेळाडू लवकर माघारी परतल्यामुळे मुंबईची खेळी घसरली आहे. मुंबईने चौथ्या दिवसाअखेरीस १५३ धावा धावफलकावर लावल्या आहेत.

पहिल्या डावात शेष भारताकडून अभिमन्यू ईश्वरन आणि ध्रुव जुरेलने मुंबईच्या गोलंदाजांची दमदार धुलाई केली. परंतु अभिमन्यूला द्विशतकाला तर जुरेलला शतकाला मुकावे लागले. या दोघांच्या विकेटनंतर शेष भारताचा डाव गडगडला आणि अवघ्या काही मिनीटात शेष भारताची खेळी आटपली.

शेष भारत संघाचे आघाडीचे फलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाहीत. अशातच सलामीवीर अभिमन्यूने शेष भारतचा डाव सावरला. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीपर्यंत शेष भारतने ४ विकेट्स गमावले अशा परिस्थितीत संघाचा भार सांभाळत असताना अभिमन्यूला ध्रुव जुरेलची साथ मिळाली.

अभिमन्यूने तिसऱ्या दिवशी १५१ धावांचा आकडा पार केला होता आणि आज त्याने ४० धावा जोडत १९१ धावांपर्यंत मजल मारली. परंतु शम्स मुलानीच्या गोलंदाजीवर झेलबाद होत अभिमन्यूला निराश होवून परतावे लागले आणि त्याचे द्विशतक थोडक्यात हूकले. खेळीदरम्यान त्याने १६ चौकार व एका षटकारासह २९२ चेंडूत १९१ धावा केल्या आहेत.

ध्रुव जुरेलने अभिमन्यूला साथ देत सुंदर फलंदाजी केली. आपल्या खेळीदरम्यान त्याने १३ चौकार व १ षटकारासह ९३ धावा जोडल्या. जुरेलचेही शतक अवघ्या ७ धावांनी हूकले. अभिमन्यू आणि ध्रुव जुरेलच्या जोडीने १६५ धावांची मोठी भागीदारी केली आहे. परंतु दोघेही पाठोपाठ माघारी परतले आणि शेष भारताचा डाव गडगडला. पुढील ५ फलंदाजांनी फक्त २० धावा केल्या आणि शेष भारत संघाचा खेळ ४१६ धावांवर आटपला. ज्यामध्ये शम्स मुलानी आणि तनुष कोटियन यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतले.

दुपारच्या सत्रामध्ये मुंबईचा दुसरा डाव सुरू झाला. मुंबईचा सलामीवीर पृथ्वी शॉ धावसंख्या उभारत असताना दुसऱ्या बाजूने मुंबईचे फलंदाज स्वस्तात माघारी परतत होते. शेवटी ३४ व्या शतकात पृथ्वी शॉ देखील ७६ धावांवरती सारांश जैनच्या गोलंदाजीवर बाद झाला. पृथ्वी शॉने ८ चौकार व एक षटकारासह १०५ चेंडूत ७६ धावा केल्या. सारांश जैनला या डावात मुंबईच्या ४ महत्वपूर्ण विकेट्स घेतण्यात यश आले.

चौथ्या दिवसाचा डाव समाप्त झाला असून मुंबईचे फलंदाज सर्फराज खान(९) व तनुष कोटियन(२०) धावांवर नाबाद आहेत. मुंबईने दुसऱ्या डावात ६ विकेट्स गमावत एकूण १५३ धावा केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.