NIAचे महासंचालक ते दहशतवाद्यांचा कर्दनकाळ अशी ओळख; आता हे निवृत्त IPS अधिकारी BCCI मध्ये सांभाळणार मोठी जबाबदारी

New BCCI Anti-Corruption Unit Head: निवृत्त आयपीएस अधिकारी शरद कुमार जे चार वर्षे दहशतवादविरोधी संघटना NIA चे प्रमुख होते. त्यांची बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी युनिटचे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
New BCCI Anti-Corruption Unit Head
New BCCI Anti-Corruption Unit HeadESakal
Updated on

New BCCI Anti-Corruption Unit Head: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने लाचलुचपत प्रतिबंधक युनिट (ACU) च्या नवीन प्रमुखाची निवड केली आहे. भारतीय क्रिकेटमधील ही महत्त्वाची जबाबदारी आता सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी सांभाळणार असून ते चार वर्षे दहशतवादविरोधी संघटनेचे (एनआयए) प्रमुखही आहेत. BCCI ने निवृत्त IPS अधिकारी शरद कुमार यांची लाचलुचपत प्रतिबंधक युनिट (ACU) चे नवीन प्रमुख म्हणून निवड केली आहे.

उत्तर प्रदेशातील बरेली येथे राहणारे शरद कुमार यांना तीन वर्षांसाठी बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख बनवण्यात आले आहे. 29 सप्टेंबर रोजी बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांच्या नावाला मंजुरी देण्यात आल्याचे बोर्डाच्या सूत्राने सांगितले. नवीन पद स्वीकारल्यानंतर, क्रिकेटमधील भ्रष्टाचाराशी संबंधित समस्या सोडवण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावतील. ज्यात मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणांचा समावेश आहे.

New BCCI Anti-Corruption Unit Head
PAK vs SL मॅचमध्ये वाद, आधी आऊट, मग नॉट आऊट... रुमालामुळे निर्णयच बदलला! काय घडलं?

नेमकं आहेत तरी कोण शरद कुमार?

शरद कुमार हे हरियाणा केडरचे 1979 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत आणि ते 2013 ते 2017 या काळात दहशतवादविरोधी संघटनेचे प्रमुख होते. NIA मध्ये राहिल्यानंतर कुमार यांची केंद्रीय दक्षता आयोगामध्ये दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. जिथे ते जून 2018 ते एप्रिल 2020 पर्यंत राहिले. एनआयएचे महासंचालक म्हणून काम करताना कुमार यांनी अनेक प्रमुख तपास आणि ऑपरेशन्समध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कार्यकाळात एनआयएने प्रतिबंधित जैश-ए-मोहम्मदच्या पठाणकोट एअरबेसवरील दहशतवादी हल्ल्यासह भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांचा तपास केला.

एनआयएची क्षमता आणि पायाभूत सुविधा वाढवण्यात कुमार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शरद कुमार हरियाणा केडरचे माजी आयपीएस अधिकारी केके मिश्रा यांची जागा घेतील. केके मिश्रा यांना गेल्या वर्षी बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी युनिटचे प्रमुख बनवण्यात आले होते. मात्र त्यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.