ENG vs WI, Test: निवृत्त झालेल्या अँडरसनची जागा घेणार 'हा' वेगवान गोलंदाज, दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघ जाहीर

James Anderson: जेम्स अँडरसनच्या निवृत्तीनंतर आता इंग्लंडने संघात त्याच्या बदली खेळाडूची घोषणा केली आहे.
James Anderson | Team India
James Anderson | Team IndiaSakal
Updated on

James Anderson Replacement in England Squad: वेस्ट इंडिज सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात वेस्ट इंडीज यजमान इंग्लंड विरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे.

या मालिकेतील पहिला सामना लॉर्ड्सवर झाला, या सामन्यात १२ जुलैला इंग्लंडने एक डाव आणि ११४ धावांनी जिंकला. पण हा सामना इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचा अखेरचा सामना ठरला.

या सामन्यानंतर ४१ वर्षीय अँडरसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने १८८ कसोटीत ७०४ विकेट्स घेत कारकि‍र्दीची अखेर केली. तो ७०० हून अधिक विकेट्स घेणारा एकूण तिसरा गोलंदाज, तर पहिला वेगवान गोलंदाज ठरला.

James Anderson | Team India
James Anderson : जेम्स अँडरसनला विजयाने निरोप; इंग्लंडची वेस्ट इंडीजवर डाव व ११४ धावांनी मात

आता त्याने निवृत्ती घेतली असल्याने इंग्लंड संघातील त्याची जागा रिकामी झाली आहे. त्यामुळे त्याच्या जागेवर वेगवान गोलंदाज मार्क वूडला दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघात सामील करण्यात आले आहे. ३४ वर्षीय वूडने ३४ कसोटीत १०८ विकेट्स घेतल्या आहेत.

संघात याआधी स्टूअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन असे खेळाडू असताना त्याला फारशी संधी मिळत नव्हती. मात्र आता ब्रॉड आणि अँडरसन हे दोघेही निवृत्त झाल्यानंतर या वूडला आता कसोटीतही नियमितपणे संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

James Anderson | Team India
IND vs ZIM: मराठमोळ्या तुषार देशपांडेला मिळाली पदार्पणाची संधी, चौथ्या T20 साठी अशी आहे 'प्लेइंग-11'

इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरी कसोटी १८ जुलैपासून सुरू होणार आहे. हा सामना नॉटिंगघम येथील ट्रेंट ब्रिज येथे खेळवला जाणार आहे.

इंग्लंडचा दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघ -

बेन स्टोक्स (कर्णधार), गस ऍटकिन्सन, शोएब बाशिर, हॅरि ब्रुक, झॅक क्रावली, बेन डकेट, डॅन लॉरेन्स, डिलियन पेनिंग्टन, ऑली पोप, मॅथ्यू पोट्स, जो रुट, जॅमी स्मिथ, ख्रिस वोक्स, मार्क वूड.

Chitra smaran:

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.