Women's Asia Cup 2024: ऋचाचं वादळी अर्धशतक ठरलं विक्रमी! भारतासाठी 'असा' पराक्रम करणारी ठरली पहिलीच विकेटकीपर

India vs UAE Women: महिला आशिया कप स्पर्धेत भारताकडून युएईविरुद्ध ऋचा घोषने आक्रमक अर्धशतक केले. याबरोबरच तिने काही विक्रमांनाही गवसणी घातली आहे.
Richa Ghosh
Richa GhoshX/BCCIWomen
Updated on

Women's Asia Cup, Rucha Ghosh Record: महिला आशिया कप 2024 स्पर्धेत रविवारी भारत विरुद्ध संयुक्त अरब अमिराती (UAE) संघात सामना होत आहे. डंबुला येथे होत असलेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 201 धावा केल्या.

भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौर आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋचा घोष यांनी अर्धशतके झळकावली.

भारतीय संघाने 106 धावांवर 4 विकेट्स गमावलेल्या असताना या दोघींची जोडी जमली. त्यांनी 75 धावांची भागीदारी केली. पण 20 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हरमनप्रीत 66 धावांवर धावबाद झाली. पण त्यांनंतर हीना होतचंदानीच्या गोलंदाजीवर ऋचाने सलग 5 चेंडूवर चौकार ठोकले.

यासह ऋचाने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील पहिले अर्धशतक झळकावले. त्याचबरोबर भारताला 200 धावांचा टप्पा पार करून दिला. ऋचा 29 चेंडूत 64 धावांवर नाबाद राहिली. तिने 12 चौकार आणि 1 षटकार मारला.

Richa Ghosh
Asia Cup 2024: W,4,4,4,4,4... ऋचाची फटकेबाजी, हरमनप्रीतचेही खणखणीत अर्धशतक; भारताचं UAE समोर 202 धावांचं लक्ष्य

ऋचाचा विक्रम

ऋचा महिला टी20 आशिया कप स्पर्धेत अर्धशतक करणारी भारताची पहिली यष्टीरक्षक फलंदाज आहे. यापूर्वी महिला टी20 आशिया कप स्पर्धेत भारताकडून यष्टीरक्षक फलंदाज म्हणून सर्वोच्च धावा करण्याचा विक्रम सुलक्षणा नाईकने केला होता. तिने पाकिस्तानविरुद्ध 2012 मध्ये 23 धावा केल्या होत्या.

याशिवाय महिला टी20 आशिया कप स्पर्धेत यष्टीरक्षक फलंदाज म्हणून सर्वोच्च धावा करण्याचा विक्रमही ऋचाच्या नावावर झाला आहे. तिने बांगलादेशच्या निगर सुलताना हिचा विक्रम मोडला आहे. सुलतानाने मलेशियाविरुद्ध 2022 मध्ये 53 धावांची खेळी केली होती.

महिला टी20 आशिया कप स्पर्धेत सर्वोच्च धावा करणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाज

  • नाबाद 64 धावा - ऋचा घोष (भारत विरुद्ध युएई, 2024)

  • 53 धावा - निगर सुलताना (बांगलादेश विरुद्ध मलेशिया, 2022)

  • 52 धावा - वॅन जुलिया (मलेशिया विरुद्ध थायलंड, 2024)

  • 49 धावा - शमिमा सुलताना (बांगलादेश विरुद्ध थायलंड, 2022)

Richa Ghosh
Women's Asia Cup 2024: भारताची विजयी सुरुवात! पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला केलं चारीमुंड्या चीत

भारताच्या पहिल्यांदाच 200 धावा पार

दरम्यान, महिला आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारतीय संघाने पहिल्यांदाच 200 धावांचा टप्पा पार केला आहे. यापूर्वी भारताचा सर्वोच्च धावसंख्या 4 बाद 198 धावा होती. या धावा भारताने इंग्लंडविरुद्ध मुंबईत 2018 मध्ये केल्या होत्या.

महिला आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारताच्या सर्वोच्च धावसंख्या

  • 201/5 - विरुद्ध युएई, डंबुला, 2024

  • 198/4 - विरुद्ध इंग्लंड, मुंबई, 2018

  • 194/5 - विरुद्ध न्यूझीलंड, गयाना, 2018

  • 187/5 - विरुद्ध ऑस्ट्रेलिया, नवी मुंबई, 2022

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.