IPL 2025 Rinku Singh leave KKR? इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वासाठी लिलाव प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. BCCI लिलावापूर्वी प्रत्येक फ्रँचायझीला ६ खेळाडूंना कायम राखण्याची मुभा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता या सहा जणांमध्ये आपला नंबर लागतो की नाही याची धाकधुक खेळाडूंना लागली आहे. संघातील स्टार खेळाडूंना कायम राखले जाईल, परंतु इतरांचे काय? अशात कोलकाता नाइट रायडर्सचा मॅच फिनिशर रिंकू सिंग याने गुगली टाकली आहे.
आयपीएलच्या २०२३च्या पर्वानंतर रिंकू सिंग हे नाव गाजतेय.. डावखुरा फलंदाज फिनिशर म्हणून प्रसिद्धीस आला आहे आणि KKR चा तो स्टार बनला आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध अहमदाबाद येथील थरारक लढतीत त्याने शेवटच्या षटकात मारलेले पाच सिक्स अजूनही चाहत्यांना चांगलेच आठवत आहेत. त्यानंतर त्याला भारताच्या आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत संधी मिळाली आणि आतापर्यंत त्याने राष्ट्रीय संघाकडून २ वन डे व २३ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत.
२६ वर्षीय खेळाडू KKR चा महत्त्वाचा खेळाडू आहे आणि आयपीएल २०२५ साठी त्याला रिटेन केले जाण्याची दाट शक्यता आहे. पण, जर कोलकाता फ्रँचायझीने रिलिज केल्यास रिंकूला विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळायचे आहे.
रिंकून स्पोर्ट्स टूडेला दिलेल्या मुलाखतीत याबाबत मोठा खुलासा केला. कोलकाता नाइट रायडर्सने रिलिज केल्यास कोणत्या संघाकडून खेळायला आवडेल, या प्रश्नावर रिंकू म्हणाला,''RCB, कारण तिथे विराट कोहली आहे.''
नुकत्याच पार पडलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या चार राखीव खेळाडूंपैकी एक रिंकू होता. बीसीसीआयने ५ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेसाठी रिंकूची निवड केलेली नाही. देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी समाधानकारक नसल्याने दुलीप ट्रॉफीसाठी निवड झाली नसल्याचे प्रामाणिक उत्तर रिंकूने दिले.
''मी चांगली कामगिरी केलेली नाही. रणजी ट्रॉफीत २-३ सामनेच खेळलो आहे आणि त्यातही अपयश आले. यामुळेच दुलीप ट्रॉफीसाठी माझी निवड झाली नाही. पुढच्यावेळेस नक्की माझी निवड होईल,''असे रिंकू म्हणाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.