मोठे अपडेट्स: Rinku Singh ला संघात दाखल होण्यासाठी BCCI ने बोलावणे धाडले; सर्फराज खान, Rishabh Pant पैकी एकाची जागा घेणार

Duleep Trophy 2024 : BCCI ने कालच बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी १६ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. त्यात आता नवीन अपडेट्स समोर येत आहेत.
Rinku Singh
Rinku Singh esakal
Updated on

Rinku Singh will replace Rishabh Pant, Sarfraz Khan or Yashasvi Jaiswal :

India vs Bangladesh यांच्यातली पहिली कसोटी १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. BCCI ने रविवारी या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर केला. जवळपास २० महिन्यानंतर ऋषभ पंतचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. जसप्रीत बुमराह हाही ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर प्रथमच टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणार आहे. या कसोटी मालिकेसाठी सराव व्हावा यासाठी भारताचे अनेक सीनियर्स खेळाडू Duleep Trophy 2024 च्या पहिल्या फेरीत खेळले. आता ते राष्ट्रीय कर्तव्यावर परतणार आहेत.

ऋषभने भारत ब संघाकडून खेळताना दुसऱ्या डावात खणखणीत अर्धशतक झळकावले होते. यशस्वी जैस्वालही याच संघाकडून खेळला होता, परंतु त्याला फार काही चांगली कामगिरी करता आलेली नाही. अशात दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीत निवड समितीकडून दुर्लक्षित राहिलेल्या रिंकू सिंगला बोलावणे धाडले गेले आहे. रिंकू सिंग दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीत India B संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे.

Rinku Singh
Jasprit Bumrah चा BCCIकडून गेम; कसोटी संघात घेतलं खरं, पण...; कुणाच्याही हे लक्षात नाही आलं

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी संघात ऋषभ, यशस्वी, सर्फराज खान यांची निवड झाल्याने India B संघात पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे रिंकूला बोलावले गेले आहे. दुलीप ट्रॉफीची दुसरी फेरी १२ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे आणि त्यात रिंकूला आपली छाप पाडण्याची मोठी संधी आहे. रिंकूने उत्तर प्रदेश ट्वेंटी-२० लीगमध्ये मिरट माव्हेरिक्सचे नेतृत्व करताना दमदार खेळ केला आहे. त्याने ४७ प्रथम श्रेणी सामन्यांत ५४.७०च्या सरासरीने ३१७३ धावा केल्या आहेत. त्यात ७ शतकं व २० अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद १६३ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे.

अभिमन्यू इश्वरच्या नेतृत्वाखाली भारत ब संघाने दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीत शुभमन गिलच्या भारत अ संघाचा ७६ धावांनी पराभव केला आहे. रिंकू म्हणाला की, मेहनत करणे माझ्या हाती आहे आणि दुलीप ट्रॉफीसाठी बोलावणे आल्याने मी आनंदी आहे. जेव्हा सुरुवातीला हा संघ जाहीर झाला, तेव्हा त्यात माझे नाव नव्हते. त्याचं मला थोडं दुःख वाटलं होतं. पण, आज मला खूप आनंद होतोय, की मी भारत ब संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

Rinku Singh
IND vs BAN 1st Test: Shreyas Iyer, मोहम्मद शमी यांना कसोटी संघात का नाही मिळालं स्थान? जाणून घ्या Inside Story

उत्तर प्रदेशातील चार खेळाडू दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळत आहेत. ध्रुव जुरेल व यश दयाल यांची कसोटी मालिकेसाठी निवड झाल्याने ते दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीत दिसणार नाहीत. रिंकू आणि आकिब खान हे उत्तर प्रदेशचे खेळाडू दिसतील. क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अंकित चॅटर्जी यांनी दिलेल्या माहितुनसार रिंकू व आकिब हे दोघंही दुलीप ट्रॉफीत भारत ब संघाकडून खेळणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.