भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना 24 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा पहिला डाव 259 धावांवर आटोपला होता, तर दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 1 गडी गमावून 16 धावा केल्या होत्या. टीम इंडिया सध्या पहिल्या डावात 243 धावांनी पिछाडीवर आहे. वॉशिंग्टन सुंदर हा पुणे कसोटीतील पहिल्या दिवसाचा स्टार खेळाडू होता. ज्याने किवी संघाच्या 7 फलंदाजांना बाद करून आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. याचबरोबर त्याचा आणि ऋषभ पंतचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात पंतचं म्हणणं ऐकून सुंदरने चूक केली. त्यामुळे त्यानंतर त्याला पश्चातापही झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तर घडलं असं की, वॉशिंग्टन सुंदर हा गोलंदाजीसाठी आला होता. तर ऋषभ पंत यष्टीरक्षण करत होता. एजाज पटेल क्रिजवर होता. यावेळी ऋषभ सुंदरला म्हणाला, एजाजला थोडा बाहेर बॉल टाक. त्यानंतर सुंदरने पुढचा बॉल बाहेर टाकला आणि या बॉलवर एजाजने चौकार मारला आहे. त्यानंतर मिश्किलपणे ऋषभ सुंदरला म्हणाला, मला काय माहिती त्याला हिंदी पण कळते. या घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
दरम्यान न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार लॅथम पुन्हा एकदा मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला, त्याला अश्विनने 15 धावांवर बाद केले. विल यंगही अवघ्या 18 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र त्यानंतर डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांच्या 62 धावांच्या भागीदारीने किवी संघाला मजबूत स्थितीत आणले. कॉनवेने 76 धावांचे अर्धशतक तर रवींद्रने 65 धावांचे अर्धशतक झळकावले.
एकेकाळी न्यूझीलंडने 3 विकेट गमावून 197 धावा केल्या होत्या. पण इथूनही विकेट्स पडण्याची प्रक्रिया सुरूच होती. पाहुण्या संघाच्या शेवटच्या सहापैकी पाच फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. न्यूझीलंडच्या डावातील शेवटच्या 6 विकेट 62 धावांतच पडल्या होत्या. भारतीय डावाला सुरुवात झाली तेव्हा कर्णधार रोहित शर्माला खातेही उघडता आले नाही. त्याला टीम सौदीने क्लीन बोल्ड केले .
न्यूझीलंडची पहिली विकेट रविचंद्रन अश्विनने घेतली, पण त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने कमान सांभाळत किवी संघाच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. सुंदरने 65 धावा करणाऱ्या रचिन रवींद्रची पहिली विकेट घेतली आणि त्यानंतर किवी फलंदाज सुंदरसमोर संघर्ष करताना दिसले. 23.1 षटकात गोलंदाजी करताना त्याने 59 धावा दिल्या आणि एकूण 7 विकेट घेतल्या. अश्विनने 24 षटके टाकली आणि 3 बळी घेतले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत अश्विनने आता ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनला मागे टाकले आहे, ज्याच्याकडे सध्या 530 विकेट आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.