Zero to hero! शुभमन गिलने भारी पराक्रम नोंदवला, आपला Rishabh Pant ही विक्रमाच्या बाबतीत मागे नाही राहिला

Rishabh Pant and Shubman Gill Record: भारत विरुद्ध बांगलादेश संघात चालू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस विक्रमी ठरला. या दिवशी शतके झळकावताना ऋषभ पंत आणि शुभमन गिल यांनी अनेक विक्रम केले.
Rishabh Pant - Shubman Gill
Rishabh Pant - Shubman GillSakal
Updated on

India vs Bangladesh, 1st test: भारत विरुद्ध बांगलादेश संघात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर चालू असलेल्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस विक्रमी ठरला. भारताकडून तिसऱ्या दिवशी ऋषभ पंत आणि शुभमन गिल यांनी शतके ठोकली. त्यामुळे त्यांनी अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

ऋषभ पंतने १२८ चेंडूत १०९ धावा केल्या, तर पहिल्या डावात शुन्यावर बाद झालेल्या गिलने दुसऱ्या डावात शानदार खेळ करताना १७६ चेंडूत ११९ धावांनी नाबाद खेळी केली. पंत आणि गिल या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १६७ धावांची भागीदारी केली.

त्यांच्या या शतकांमुळे भारताने नंतर दुसरा डाव ६४ षटकात ४ बाद २८७ धावांवर घोषित केला. तसेच पहिल्या डावातील २२७ धावांच्या आघाडीसह बांगलादेशसमोर ५१५ धावांचे आव्हान ठेवले.

बांगलादेशने तिसरा दिवस संपला तेव्हा दुसऱ्या डावात ३७.२ षटकात ४ बाद १५८ धावा धावा केल्या आहेत. तत्पुर्वी भारताने पहिल्या डावात सर्वबाद ३७६ धावा केल्या होत्या, तर बांगलादेशने पहिल्या डावात सर्वबाद १४९ धावांची खेळी केली.

Rishabh Pant - Shubman Gill
IND vs BAN: वेलकम बॅक Rishabh Pant! वादळी शतक पाहून स्टेडियममधील आज्जीही भारावल्या, पाहा Video

तिसऱ्या दिवशी झालेले विक्रम

मायदेशात कसोटीत भारतासाठी दुसऱ्या डावात दोन फलंदाजांनी केलेली शतकं

  • व्हीव्हीएस लक्ष्मण (२८१ धावा) आणि राहुल द्रविड (१८० धावा) - (वि. ऑस्ट्रेलिया, कोलकाता, २००१)

  • सचिन तेंडुलकर (१७६ धावा) आणि व्हीव्हीएस लक्ष्मण (१५४* धावा) - (वि. वेस्ट इंडीज, कोलकाता, २००२)

  • गौतम गंभीर (११४ धावा) आणि सचिन तेंडुलकर (१००*) (वि. श्रीलंका, अहमदाबाद, २००९)

  • शुभमन गिल (११९*) आणि ऋषभ पंत (१०९) (वि. बांगलादेश, चेन्नई, २०२४)

भारताने प्रतिस्पर्ध्यांसमोर ठेवलेले सर्वोच्च धावांचे लक्ष्य

  • ६१७ धावा - विरुद्ध न्यूझीलंड, वेलिंग्टन, २००९

  • ५५७ धावा - विरुद्ध इंग्लंड, राजकोट, २०२४

  • ५५० धावा - विरुद्ध श्रीलंका, गॉल, २०१७

  • ५४० धावा - विरुद्ध न्यूझीलंड, मुंबई, २०२१

  • ५२१ धावा - विरुद्ध इंग्लंड, नॉटिंगघम, २०१८

  • ५१६ धावा - विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मोहाली, २००८

  • ५१५ धावा - विरुद्ध बांगलादेश, चेन्नई, २०२४

  • ५१३ धावा - विरुद्ध बांगलादेश, चितगाव, २०२२

  • ५०९ धावा - विरुद्ध श्रीलंका, अहमदाबाद, २००५

  • ५०० धावा - विरुद्ध इंग्लंड, द ओव्हल, २००७

मायदेशात पहिल्या डावात शुन्य आणि दुसऱ्या डावात शतक करणारे भारतीय फलंदाज

  • गुंडप्पा विश्वनाथ - ० आणि १३७ धावा (वि. ऑस्ट्रेलिया, कानपूर, १९६९)

  • सचिन तेंडुलकर - ० आणि १३६ धावा (वि. पाकिस्तान, चेन्नई, १९९९)

  • विराट कोहली - ० आणि नाबाद १०४ धावा (वि. श्रीलंका, कोलकाता, २०१७)

  • शुभमन गिल - ० आणि नाबाद ११९ धावा (वि. बांगलादेश, चेन्नई, २०२४)

Rishabh Pant - Shubman Gill
IND vs BAN: भाई कॅमेरा अपने पे है! विराट-रोहितच्या मस्तीनं चक्क गंभीरलाही खळखळून हसवलं, ड्रेसिंग रुममध्ये Video Viral

एकाच वर्षात मायदेशातील कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर तीन शतके करणारे भारतीय

  • दिलीप वेंगसरकर - १९७९

  • चेतेश्वर पुजारा - २०१२

  • चेतेश्वर पुजारा - २०१६

  • शुभमन गिल - २०२४

कसोटी सर्वाधिक शतके करणारे भारतीय यष्टीरक्षक फलंदाज

  • ६ शतके - ऋषभ पंत (५८ डाव)

  • ६ शतके - एमएस धोनी (१४४ डाव)

  • ३ शतके - वृद्धिमान सहा (५८ डाव)

  • २ शतके - भुदी कुंदरन (२८ डाव)

  • २ शतके - फारुख इंजिनियर (८७ डाव)

चेन्नईमध्ये कसोटीत शतक करणारे भारतीय यष्टीरक्षक फलंदाज

  • २२४ धावा - एमएस धोनी (वि. ऑस्ट्रेलिया, २०१३)

  • १०९ धावा - फारुख इंजिनियर (वि. वेस्ट इंडीज, १९६७)

  • १०९ धावा - ऋषभ पंत (वि. बांगलादेश, २०२४)

साल २०२४ मध्ये भारतासाठी सर्वाधिक कसोटी शतके करणारे फलंदाज

  • ३ शतके - शुभमन गिल

  • २ शतके - यशस्वी जैस्वाल

  • २ शतके - रोहित शर्मा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये सर्वाधिक शतके करणारे भारतीय फलंदाज

  • ९ शतके - रोहित शर्मा

  • ५ शतके - शुभमन गिल

  • ४ शतके - मयंक अगरवाल

  • ४ शतके - ऋषभ पंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.