Viral Video: ऋषभ पंतने केली गोलंदाजी; नेटिझन्सने म्हणाले, हा तर गौतम गंभीरचा 'धाक'!

Delhi Premier League: दिल्ली प्रीमिअर लीगच्या पहिल्याच सामन्यात चर्चा रंगली ती ऋषभ पंत याची.. यावेळी त्याचा सत्कार समारंभही पार पडला
rishabh pant bowling
rishabh pant bowlingesakal
Updated on

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत ( Rishabh Pant) याने दिल्ली प्रीमिअर लीगच्या पहिल्या सामन्यात छाप पाडली. पुरानी दिल्ली ६ संघाकडून खेळताना ऋषभने दक्षिण दिल्ली सुपरस्टारविरुद्धच्या सामन्यात शेवटचे षटक टाकले. ऋषभला गोलंदाजी करताना पाहून नेटिझन्स सैराट झाले. ऋषभ पंतने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केव्हाच गोलंदाजी केलेली नाही, परंतु यावेळी त्याने प्रतिस्पर्धी संघ सुपरस्टार यांना विजयासाठी १ धाव हवी असताना शेवटच्या षटकात गोलंदाजी केली.

ऋषभचा गोलंदाजी करतानाचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे आणि अनेकांनी त्याच्या या प्रयत्नाचा संदर्भ गौतम गंभीरशी जोडला. गौतमने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर सूर्यकुमार यादव, शुभमन गिल व रोहित शर्मा यांनी गोलंदाजी केली. सुपरबाज संघाने कर्णधार आयुष बदोणी आणि प्रियांश आर्या यांच्या अर्धशतकांच्या जोरावर हा सामना ३ विकेट्सने जिंकला.

अर्पीत राणाने ४१ चेंडूंत ५९ धावांची खेळी केली, तर वंश बेदीने १९ चेंडूंत ४७ धावा चोपलून पुरानी दिल्ली ६ संघाला २० षटकांत ३ बाद १९७ धावांपर्यंत पोहोचवले. पण, दक्षिण दिल्लीने १९.१ षटकांत हे लक्ष्य पार केले.

दक्षिण दिल्लीने प्रियांश व सार्थक रे यांच्या फटकेबाजीच्या जोरावर पॉवर प्लेमध्येच ७३ धावा चोपल्या. रे २६ चेंडूंत ४१ धावा करून शिवम शर्माच्या गोलंदाजीवर सातव्या षटकात बाद झाला. आर्याने २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर कर्णधार बदोणीने खणखणीत फटकेबाजी केली.

३० चेंडूंत ५७ धावा करणाऱ्या आर्याला अप्रित राणाने बाद केले. त्याच्या खेळीत ३ चौकार व ४ षटकारांचा समावेश होता. त्यानंतर ध्रुव सिंग १ धाव करून माघारी परतला, परंतु कर्णधार बदोणी मैदानावर उभा राहिला. त्याने २५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. दक्षिण दिल्ली संघालला ३६ चेंडूंत ३८ धावा विजयासाठी करायच्या होत्या. पण, पुरानी दिल्लीने कमबॅक केले. बदोणी २९ चेंडूंत ५७ धावांवर तर तेजस्वी ( ०), कुनवार बिधुरी ( ५) व सुमित माथूर ( ९) हे झटपट बाद झाले. दिल्लीला शेवटच्या दोन षटकांत विजयासाठी १३ धावा हव्या असताना विजन पांचाल व दिग्वेश राठी यांनी ५ चेंडू राखून विजय मिळवून दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()