IPL 2025 मध्ये बदलाचे वारे! MS Dhoni निवृत्ती घेणार अन् चेन्नईत ऋषभ पंतची एन्ट्री होणार; पण ऋतुराजचं काय?

Rishabh Pant: आयपीएल 2025 स्पर्धेआधी मेगा ऑक्शन होणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
MS Dhoni - Rishabh Pant
MS Dhoni - Rishabh PantSakal
Updated on

Rishabh Pant may replace MS Dhoni in CSK : इंडियन प्रीमियर लीग 2025 स्पर्धेआधी मेगा ऑक्शन होणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध रिपोर्ट्सही बाहेर येत आहेत. आता असे समोर येत आहे की दिल्ली कॅपिटल्स त्यांचा कर्णधार ऋषभ पंतला करारमुक्त करू शकतात.

दैनिक जागरणने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार दिल्ली कॅपिटल्स पंतच्या कामगिरीवर फारसे खूश नाहीत. त्यामुळे ते त्याला करारमुक्त करू शकतात.

त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सच्या एका सुत्राने सांगितले की जर एमएस धोनी आयपीएल 2025 स्पर्धा खेळणार नसेल, तर फ्रँचायझी पंतसाठी प्रयत्न करू शकतात. म्हणजेच जर पंत लिलावात उपलब्ध असेल, तर चेन्नई त्याला संघात घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की दिल्लीने आपल्या कर्णधारालाच ऑक्शनपूर्वी करारमुक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी श्रेयस अय्यरलाही दिल्लीने करारमुक्त केले होते, त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने त्याला आपल्या संघात स्थान दिले होते.

MS Dhoni - Rishabh Pant
IPL 2025: गांगुलीला कोच म्हणून केलं रिजेक्ट, दिल्लीचा शोध 'गंभीर'साठी?

दरम्यान, रिपोर्ट्सनुसार केवळ दिल्ली कॅपिटल्स संघातच नाही, तर मुंबई इंडियन्स संघातही मोठ्या बदलांची शक्यता आहे. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव हे दोन खेळाडूही मुंबई इंडियन्स संघातून बाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यांना संघात घेण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स उत्सुक असल्याचे समजत आहे.

याशिवाय लखनौ सुपर जायंट्स देखील केएल राहुलवर फारसे खूश नसल्याचे समजत आहे. त्यामुळे ते त्यालाही करारमुक्त करण्याची शक्यता आहे.

जर तो लिलावात उतरला, तर त्याच्यावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ मोठी बोली लावू शकतात. तसेच त्याच्याकडे नेतृत्वाची धूराही सोपवू शकतात. गेल्या तीन हंगामात फाफ डू प्लेसिसने या संघाचे नेतृत्व केले होते, परंतु त्यालाही या संघाला विजेतेपद जिंकून देता आलेले नाही.

दरम्यान, अद्याप आयपीएल 2025 साठीच्या मेगा ऑक्शनबाबत बीसीसीआयने काहीही स्पष्ट माहिती दिलेली नाही.

MS Dhoni - Rishabh Pant
Delhi Capitals: रिकी पाँटिंग अन् दिल्लीचे मार्ग झाले वेगळे, IPL 2025 साठी संघाला मिळणार नवा कोच

ऋतुराज गायकवाडचे काय?

दरम्यान,जर रिपोर्ट्सनुसार जर ऋषभ पंतला चेन्नईने संघात घेतले,तर तो या संघात केवळ यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळणार की त्याला नेतृत्वाचीही जबाबदारी दिली जाणार हे पाहावे लागेल.

आयपीएल 2024 पूर्वी धोनीने या संघाचे कर्णधारपद सोडले होते आणि ही जबाबदारी ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर सोपवली होती. ऋतुराजच्या नेतृत्वात आयपीएल 2024 मध्ये चेन्नई पाचव्या क्रमांकावर राहिली होती. तसेच पंतनेही दिल्लीने चांगले नेतृत्व दोन हंगामात केले आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये पोहचण्यात अपयश आले, तरी ऋतुराजला नेतृत्वपदावरून काढून टाकणार नसल्याचे चेन्नईच्या संघव्यवस्थापनाने सांगितले होते. मात्र, आता आलेल्या नव्या रिपोर्ट्स पाहाता आता पुन्हा चेन्नई संघात नेतृत्वबदल होणार की ऋतुराजच कर्णधारपदी कायम राहणार, हे येत्या काळात समजणार आहे.

Chitra kode:

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.