Rishabh Pant ने बॅटिंग करताना का लावली होती बांगलादेशची फिल्डिंग, सामना जिंकल्यानंतर स्वत:च केला खुलासा

Why Rishabh Pant Set Bangladesh Fielding: चेन्नई कसोटीत भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत बांगलादेशची फिल्डिंग लावताना दिसला होता. आता त्याने असं का केलं, याचं कारण स्पष्ट केले आहे.
Rishabh Pant | Chennai Test
Rishabh Pant | Chennai TestSakal
Updated on

Rishabh Pant Video: भारतीय क्रिकेट संघाने बांगलादेशला कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यांत २८० धावांनी पराभूत केले. यासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यादरम्यान भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत चर्चेत राहिला.

यष्टीरक्षण करत असताना तो सातत्याने आपल्याच संघातील खेळाडूंशी, तर कधी प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांशी बोलताना दिसला. याशिवाय तो भारताच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना एकदा तर बांगलादेशचे क्षेत्ररक्षण लावताना दिसला होता.

तो बांगलादेशच्या खेळाडूला एक जागा रिकामी असून तिथे क्षेत्ररक्षक लावा असं सांगताना दिसत होता. विशेष म्हणजे त्याचं ऐकून बांगलादेशने क्षेत्ररक्षणात बदलही केलेला दिसला. त्याचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. आता त्याने त्यामागील कारणही स्पष्ट केले आहे.

Rishabh Pant | Chennai Test
भयंकर अपघातातून वाचला अन् मेहनतीने केले पुनरागमन; Rishabh pant बद्दल काय म्हणाला Shubman Gill ?

भारताच्या विजयानंतर ब्रॉडकास्टिंग चॅनलशी बोलताना माजी यष्टीरक्षक सबा करिम यांनी यामागील कारण त्याला विचारले होते. त्यावेळी पंतने मजेशीर खुलासा केला. त्याने सांगितले की मैदानाबाहेर अजय जडेजा यांच्याबरोबर झालेल्या संभाषणाने त्याला यासाठी प्रेरणा दिली.

त्याने सांगितले की अजय जडेजा बऱ्याचदा म्हणतात की कोणताही संघ असला, तरी चांगल्या दर्जाचे क्रिकेट होणे महत्त्वाचे आहे.

पंत म्हणाला, 'अजय भाई आणि मी नेहमीच क्रिकेट कसे चांगले असू शकते, यावर बोलतो; मग आपला संघ असो किंवा दुसरा संघ. त्यावेळी त्या जागेवर कोणताच क्षेत्ररक्षक नव्हता, एकाच ठिकाणी दुसरीकडे दोन क्षेत्ररक्षक उभे होते. त्यामुळे मी बांगलादेशच्या कर्णधाराला सांगितले की एक क्षेत्ररक्षक दुसरीकडे पाठव.'

दरम्यान, पंतने या सामन्यात दुसऱ्या डावात १०९ धावांची शतकी खेळी केली. तसेच हा त्याचा जवळपास २० महिन्यांनंतरचा पहिला कसोटी सामना होता. डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या अपघातानंतर पंत जवळपास दीड वर्षे क्रिकेट खेळला नव्हता. पण त्यानंतर आता तो पूर्ण तंदुरुस्त झाले असून त्याने कसोटीमध्ये पुनरागमन केले आहे.

Rishabh Pant | Chennai Test
Zero to hero! शुभमन गिलने भारी पराक्रम नोंदवला, आपला Rishabh Pant ही विक्रमाच्या बाबतीत मागे नाही राहिला

सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर पंतसह दुसऱ्या डावात शुभमन गिलनेही ११९ धावांची नाबाद खेळी केली होती. त्यामुळे भारताने दुसरा डाव २८७ धावांवर घोषित करत पहिल्या डावातील २२७ धावांच्या आघाडीसह बांगलादेशसमोर ५१५ धावांचे लक्ष्य ठेवले होते.

या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशला सर्वबाद २३४ धावाच करता आल्या. दुसऱ्या डावात भारताकडून आर अश्विनने ६ विकेट्स घेतल्या.

पहिल्या डावात भारताने सर्वबाद ३७६ धावा केल्या होत्या. भारताकडून पहिल्या डावात आर अश्विनने ११३ धावांची खेळी केली होती, तर रविंद्र जडेजाने ८६ धावा केल्या होत्या. यशस्वी जैस्वालनेही ५६ धावा केल्या होत्या. बांगलादेशला दुसऱ्या डावात १४९ धावाच करता आल्या होत्या. या सामन्यात अश्विनसह जडेजानेही अष्टपैलू कामगिरी नोंदवली. त्यानेही दोन्ही डावात मिळून ५ विकेट्स घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.