India vs New Zealand 1st Test: भारतीय क्रिकेट संघाने बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटीत दुसऱ्या डावात दमदार पुनरागमन केले आहे. या सामन्यात पहिल्या डावावर न्यूझीलंडचे वर्चस्व दिसले, तर दुसऱ्या डावात आत्तापर्यंत भारतीय संघाचे वर्चस्व राहिल्याचे दिसून आले आहे.
या सामन्यात भारतासाठी दुसऱ्या डावात सर्फराज खान आणि ऋषभ पंत यांनी दमदार दीडशतकी भागीदारी केली. दरम्यान, सर्फराजने दीडशतक पूर्ण केले. मात्र, ऋषभ पंतचं शतक अवघ्या १ धावेनं हुकलं. पण असं असलं तरी या दोघांच्या भागीदारीमुळे भारताला दुसऱ्या डावात आघाडी घेण्यात यश मिळाले आहे.
या सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात ४६ धावांवर सर्वबाद झाल्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात ४०२ धावा केल्या आणि ३५६ धावांची आघाडी घेतली होती. परंतु, दुसऱ्या डावात सर्फराज खान आणि ऋषभ पंत यांनी दमदार फलंदाजी केली.