ICC Men's Test Rankings: न्यूझीलंडविरुद्धची पहिली कसोटी गाजवणाऱ्या ऋषभ पंतने आयसीसीच्या ताज्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. बंगळुरू कसोटीत ऋषभने दोन्ही डावांत २० व ९९ धावांची खेळी केली होती.
अपघतानंतर पुनरागमन करतानाचा हा त्याचा तिसरा कसोटी सामना होता. ऋषभच्या या खेळीचा आयसीसी क्रमवारीत मोठा फायदा झाला आणि तो विराट कोहलीच्याही पुढे निघून गेला. ऋषभने तीन स्थानांची झेप घेताना सहावा क्रमांक पटकावला आहे आणि विराटची आठव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. इंग्लंडच्या जो रूटने ९१७ रेटिंगसह अव्वल स्थानावरील पकड मजबूत ठेवली आहे.