नागाच्या पिल्लाला का ग खवळलं ? ऋषभ पंतची बॉलिंग आणि राहुलचा प्रश्न, Video Viral

IND vs BAN series: बांगलादेश विरूद्ध मालिकेतील विजयानंतर भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंतने सोशल मीडियीवर शेअर केलेला व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
rishabh pant
rishabh pantesakal
Updated on

Rishabh Pant Viral Video: बांगलादेश विरूद्ध मालिकेत भारताने एकतर्फी विजय मिळवल्यानंतर भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंतने सामन्यातील काही क्षण इंस्टाग्राम रीलद्वारे शेअर केले आहे. या रीलमध्ये त्याने 'गडूळाचं पाणी' हे मराठी गाणे वापरले आहे. ऋषभ पंत नेहमीच आपल्याला मैदानावर मौज-मस्ती करताना पहायला मिळतो. या व्हिडीओमध्येही ऋषभने मालिकेतील किस्से शेअर केले आहेत. ऋषभचा हा व्हिडीओ प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहे.

पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात ऋषभने १०९ धावांची शतकी खेळी केली. या खेळीदरम्यान ऋषभने १३ चौकार व ४ षटकार लगावले. मालिकेत 'कॅम्पा ग्रेट इंडियन स्ट्रायकर ऑफ द मॅच' पुरस्कार ऋषभ पंतला मिळाला. ऋषभ पंतने ह्या विजयाच्या आनंदोत्सवात इंस्टाग्रामवर एक रील शेअर केली आहे.

ज्यामध्ये पंत नेटमध्ये गोलंदाजीचा सराव करताना पहायला मिळत आहे. त्यावर केएल राहूल म्हणतो, "ऋषभ तू दिल्ली प्रीमिअर लीगमध्येही गोलंदाजी केली होतीस ना?" त्यावर ऋषभ म्हणाला, हो मग काय एकच धाव तर हवी होती. तितक्यात शुभमन गिल म्हणतो, " म्हणजे तगडी प्रॅक्टीस केली होती तू ऋषभ." असा संवाद या व्हिडीओमध्ये पहायला मिळतो.

भारताने ही मालिका २-० अशा फरकाने जिंकली. पहिल्या सामन्यातील सामनावीर आर अश्विन मालिकावीर ठरला. तर दुसऱ्या सामन्यात यशस्वी जैस्वालला सामनावीर पुरस्कार मिळाला. जैस्वालने दुसऱ्या सामन्यातील दोन्ही डावात अर्धशतके झळकावली. यशस्वी जैस्वाल व रोहित शर्मा यांनी ३ षटकांत पन्नास धावा करत कसोटीतील वेगवान फिफ्टी पूर्ण केली.

कसोटी मालिकेतील या विजयानानंतर तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. या संघाचे नेतृत्व सुर्यकुमार यादव करणार असून अभिषेक शर्मा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, जितेश शर्मा, रियान पराग या युवा खेळाडूंना संघात संधी देण्यात आली आहे.

rishabh pant
Mohammed Shamiचे टीम इंडियातील पुनरागमन लांबवले; सरावादरम्यान झाली आणखी एक नवी दुखापत

भारतीय ट्वेंटी-२० संघ :

सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव

भारत विरुद्ध बांगलादेश ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक

६ ऑक्टोबर - पहिला टी२० सामना, ग्वाल्हेर (संध्या. ७ वा.)

९ ऑक्टोबर - दुसरा टी२० सामना, दिल्ली (संध्या. ७ वा.)

१२ ऑक्टोबर - तिसरा टी२० सामना, हैदराबाद (संध्या. ७ वा.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.