Rishabh Pant: तब्बल 14 महिन्यांनी IPL मधून कमबॅक करणारा पंत म्हणतोय, 'खरंच चमत्कार घडला, आता...'

Rishabh Pant react of Comeback: तब्बल 14 महिन्यांनी आयपीएलमधून क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यास आतुर असलेल्या ऋषभ पंतने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Rishabh Pant | IPL 2024
Rishabh Pant | IPL 2024X/IPL
Updated on

Rishabh Pant News : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत 14 महिन्यांनंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. त्याला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळण्यास बीसीसीआयची परवानगीही मिळाली आहे. दरम्यान, पुनरागमन करण्यापूर्वी थोडी भीती मनामध्ये असल्याचे त्याने म्हटले आहे.

पंतचा डिसेंबर 2022 च्या अखेरीस गंभीर कार अपघात झाला होता. त्यात त्याला अनेक जखमा झाल्या होत्या. तसेच त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. त्याने नंतर बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत त्याच्या तंदुरुस्तीवर काम केले आहे.

यानंतर बीसीसीआयकडून पंतची तंदुरुस्ती चाचणी घेण्यात आली होती, ज्यात तो उत्तीर्ण झाला. त्यामुळे आयपीएल 2024 मधील त्याच्या सहभागाचा मार्ग मोकळा झाला.

Rishabh Pant | IPL 2024
IPL 2024 दरम्यानच 'हा' संघ जाणार पाकिस्तान दौऱ्यावर, असे आहे T20I मालिकेचे संपूर्ण शेड्युल

22 मार्चपासून सुरू होत असलेल्या आयपीएलच्या यंदाच्या 17 व्या हंगामात पंत दिल्ली कॅपिटल्सकडूनच खेळणार आहे. तसेच दिल्ली संघाचे कर्णधारपदही त्याच्याकडेच असण्याची शक्यता आहे. दिल्ली कॅपिटल्सचा आयपीएल 2024 मधील पहिला सामना पंजाब किंग्सशी २३ मार्चला होणार आहे.

पुनरागमनाबाबत पंत म्हणाला, 'बीसीसीआय, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील (NCA) स्टाफ यांची खूप मदत झाली. चाहत्यांचा पाठिंबा मिळाला. त्यामुळे मी तंदुरुस्त झालो. खरंच चमत्कार घडला, असंच मी म्हणेल. आता दिल्ली कॅपिटल्स संघाशी जोडण्यासाठी उत्सुक आहे. दिल्ली संघाच्या चाहत्यांसमोर आपला खेळ दाखवण्यासाठीही आतुर झालो आहे.'

Rishabh Pant | IPL 2024
Ranji Trophy Final: चौथ्या दिवशी करुण नायर मुंबईला नडला, विदर्भाच्या कर्णधाराचेही नाबाद अर्धशतक; फायनल रोमांचक वळणावर

दरम्यान पंत तंदुरुस्त झाल्याने भारतीय संघालाही दिलासा मिळाला आहे. कारण कॅरेबियन देश (वेस्ट इंडीज) आणि अमेरिकेमध्ये टी20 वर्ल्डकपचे आयोजन येत्या जून महिन्यात करण्यात येणार आहे.

जर पंतने आयपीएलमध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून पुनरागमन करताना चांगली छाप पाडली, तर त्याचे भारतीय संघातही त्याचे पुनरागमन होऊ शकते. याबाबतचे संकेतही बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.