Rishabh Pant: रोहित शर्माच्या 'Fake Injury' दाव्यावर ऋषभ पंतची प्रतिक्रिया; सांगितलं नेमकं काय घडलं... Video Viral

Fake Injury Rishabh Pant : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये सामन्याचा वेग संथ करण्यासाठी यष्टिरक्षक ऋषभ पंतने दुखापत झाल्याचं नाटक केल्याचं रोहित शर्माने उघड केले होते. त्यानंतर आता ऋषभची त्यावर प्रतिक्रिया आली आहे.
rishabh pant Fake Injury
rishabh pant Fake Injury esakal
Updated on

T20 World Cup Final 2024 : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून आयसीसी स्पर्धेतील ११ वर्षांचा दुष्काळ संपवला. २०२३च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचूनही भारताला जेतेपदाला मुकावे लागले होते. तशीच परिस्थिती २०२४च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतही उद्भवली होती.. दक्षिण आफ्रिकेने भारतीय चाहत्यांना तणावाखाली ठेवले होते. पण, सूर्यकुमार यादवच्या अद्भूत झेलने सामना फिरला अन् भारताने ७ धावांनी मॅच जिंकून जेतेपदाची ट्रॉफी उंचावली. अटीतटीच्या या सामन्यात आफ्रिकेने कडवी टक्कर दिली होती आणि त्यांना विजयासाठी विजयासाठी २६ चेंडूत २४ धावांची गरज असताना ऋषभ पंतने ( Rishabh Pant) शक्कल लढवली. रोहितने नुकतंच ही ट्रिक सर्वांना सांगितली आणि आता त्यावर ऋषभची प्रतिक्रिया आली आहे.

स्टार स्पोर्ट्स कार्यक्रमादरम्यान पंत म्हणाला की,"सामन्याचे चित्र बदलले होते. मागील दोन-तीन षटकांत आफ्रिकेच्या फलंदाजांनी जास्त धावा चोपल्या होत्या. त्यामुळेच मी ब्रेक घेण्यासाठी दुखापत झाल्याचे नाटक केले. फिजिओ आल्यावर मी त्याला तेच सांगत होतो, "मला वेळ काढायचा आहे. रोहित भाई विचारत होता, तू ठीक आहेस ना? मी हो म्हणालो. भाऊ, मी फक्त अभिनय करतोय."

rishabh pant Fake Injury
Rishabh Pant DC : ऋषभ पंतला Delhi Capitals सोबत नाही राहायचंय? कर्णधाराच्या 'त्या' ट्विटने चाहते संभ्रमात

पंत पुढे म्हणाला, "हे असं प्रत्येक वेळी ते काम करेलच, असा मी दावा करत नाही. पण, ते माझ्यासाठी महत्त्वाच्या सामन्यांमध्ये काम करते. ते कधी कधी काम करते.अशा क्षणी ते काम करते काय? सांगा."

फायनलमध्ये काय घडलं?

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १७६ धावांपर्यंत मजल मारली होती. विराट कोहलीच्या संयमी ७६ धावांना अक्षर पटेल ( ४७) व शिवम दुबे ( २७) यांच्या मॅच्युअर खेळीची साथ मिळाल्याने भारताने ही धावसंख्या उभी केली. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारतीय चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवली होती. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेलाही धक्के बसलेच. क्विंटन डी कॉक ( ३९) व त्रिस्तान स्तब्स ( ३१) माघारी परतल्यानंतर डेव्हिड मिलर व हेनरिच क्लासेन यांनी आफ्रिकेला विजयी मार्गावर आणले होते. तेव्हा ऋषभने दुखापतीचं नाटक करून सामन्याची गती संथ केली आणि त्यानंतर सूर्याकुमार यादवच्या कॅचने मॅच फिरवली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.