Rishabh Pant Retained by DC: इंडियन प्रीमियर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलने २८ सप्टेंबर रोजी आयपीएलच्या नव्या रिटेशन नियमांची घोषणा केली. या नव्या नियमांमुळे सर्वच फ्रँचायझींसमोर आयपीएल २०२५ साठी संघ तयार करण्याचे माठे आव्हान निर्माण झाले आहे. कारण फ्रँचायझींना आता संघात ६ खेळाडूंना कायम ठेवण्यासाठी तब्बल ७९ कोटी रूपये मोजावे लागणार आहेत. अशातच दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतला संघात कायम ठेवण्यावर जवळजवळ शिक्कामोर्तब केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत चेन्नई सुपर किंग्ज मध्ये जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती. कारण एम एस धोनीच्या आयपीएल निवृत्तीनंतर सीएसके संघाला चांगला यष्टीरक्षक व कमी चेंडूत धावा करणाऱ्या धडाकेबाज फलंदाजाची गरज भासेल. त्यामुळे सीएसके भारतीय यष्टारक्षक ऋषभ पंतला खरेदी करेल असे सांगितले जात होते. आता दिल्ली कॅपिटल्स संघाचे सह-मालक पार्थ जिंदाल यांनी ऋषभ पंत संघात कायम राहील असे निश्चित केले आहे. त्यामुळे ऋषभ पंत बाबतच्या सर्व अफवांना पूर्णविराम लागला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना जिंदाल यांनी सांगितले की, “आमच्या संघात काही चांगले खेळाडू आहेत. नुकतेच रिटेशनचे नवे नियम आले आहेत, त्यामुळे जीएमआर समुह आणि आमचे क्रिकेट संचालक सौरव गांगुली यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. ऋषभ पंतला नक्कीच संघात कायम ठेवण्यात येईल.”
“आमच्याकडे अक्षर पटेल देखील आहे, जो एक उत्कृष्ट खेळाडू आहे. ट्रिस्टन स्टब्स, जेक फ्रेझर-मॅकगर्क, कुलदीप यादव, अभिषेक पोरेल, मुकेश कुमार आणि खलील अहमद हे सर्व चांगले खेळाडू आमच्या संघात आहेत. लिलावात काय होते ते आपण पाहू. पण लिलावाआधी नियमानुसार आम्ही सहा खेळाडूंना कायम ठेवू शकतो. चर्चेनंतर, आम्ही पुढील निर्णय घेऊ व लिलावात पुढे जाऊ.” जिंदाल पुढे म्हणाले.
ऋषभ पंत,
मिचेल मार्श,
हॅरी ब्रूक,
जेक फ्रेझर-मॅकगर्क,
अक्षर पटेल,
अभिषेक पोरेल
एखादा संघ ५ कॅप्ड आणि १ अनकॅप्ड खेळाडू संघात कायम ठेवू शकतो. या ६ खेळाडूंसाठी एकूण ७९ कोटी रुपये खर्च करावे लागतील. त्यामुळे त्यांच्याकडे लिलावासाठी ४१ कोटी रुपये शिल्लक असतील. तसेच लिलावासाठी RTM कार्ड वापरू शकत नाही.
तर एखाद्या संघाने ४ कॅप्ड आणि १ अनकॅप्ड खेळाडूंना कायम ठेवले. तर तो संघ या पाच खेळाडूंसाठी ६५ कोटी खर्च करेल, तर त्यांच्याकडे लिलावात एक RTM कार्ड असेल आणि ५५ कोटी रुपये लिलावासाठी शिल्लक असतील.
तसेच जरी एखाद्या संघाने जर ३ खेळाडू लिलावापूर्वी कायम ठेवले, तर ते ३ RTM कार्ड लिलावात वापरू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.