Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

BCCI gives updates on Rishabh Pant Knee Injury: भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या गुडघ्याला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीदरम्यान दुखापत झाली आहे. याबाबत बीसीसीआयने अपडेट्स दिले आहेत.
Rishabh Pant | India vs New Zealand 1st test
Rishabh Pant | India vs New Zealand 1st testSakal
Updated on

India vs New Zealand 1st Test: भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळत असून बंगळुरुला पहिला कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी खेळाला सुरूवात झाली.

मात्र, भारतीय संघ पहिल्या डावात अवघ्या ४६ धावांत सर्वबाद झाला. त्यानंतरही भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा मुख्य यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत दुखापतग्रस्त झाला आहे.

न्यूझीलंड संघाचा पहिला डाव सुरू असताना रविंद्र जडेजाने टाकलेला चेंडूवर डेवॉन कॉनवे शॉट खेळायला चुकला. त्यामुळे चेंडू मागे गेला. पण पंतही तो चेंडू झेलू शकला नाही आणि तो चेंडू त्याच्या गुडघ्यावर आदळला.

गुडघ्यावर चेंडू आदळल्यानंतर पंत वेदनेने कळवळताना दिसला. त्यानंतर तो फिजिओबरोबर मैदानातून बाहेरही गेला. त्याच्याऐवजी नंतर बदली यष्टीरक्षक म्हणून ध्रुव जुरेलने यष्टीरक्षण केले.

Rishabh Pant | India vs New Zealand 1st test
IND vs NZ 1st Test : Rishabh Pant ला दुखापत, सोडावे लागले मैदान! टीम इंडियासाठी दुष्काळात तेरावा महिना...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.