Rohit Sharma News: भारतीय कसोटी संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर लवकरच जात आहे. भारताला २२ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ही ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.
भारताने काही दिवसांपूर्वीच न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत ०-३ अशा फरकाने पराभव स्वीकारल्यानंतर आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेच्या दृष्टीने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी भारतासाठी महत्त्वाची मानली जात आहे.
अशातच अशी चर्चा आहे की भारताचा कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या एक किंवा दोन कसोटी सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. तो लवकरच दुसऱ्यांदा बाबा बनणार आहे. त्यामुळेच तो पालकत्व रजा घेण्याची शक्यता आहे.