Riyan Parag: 'मी एवढ्या ट्रोलिंगसाठी पात्र नव्हतो, पण लोक...', भारतीय संघाकडून पदार्पणापूर्वी रियान झाला व्यक्त

Riyan Parag on Trolling: रियान पराग टीम इंडियाकडून पदार्पणासाठी सज्ज असून त्यापूर्वी त्याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
Riyan Parag
Riyan ParagSakal
Updated on

Riyan Parag: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका ६ जुलैपासून सुरू होत आहे. आसामचा फलंदाज रियाग पराग यालाही झिम्बाब्वेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. त्याची प्रथमच भारतीय संघात निवड झाली आहे.

परागने आयपीएल 2024 मध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. त्याने राजस्थान रॉयल्ससाठी (RR) 15 सामन्यांमध्ये 52.09 च्या सरासरीने 573 धावा केल्या, ज्यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश आहे. परागचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी त्याने आपल्या आयुष्यातील एक मोठे उद्दिष्ट सांगितले आहे.

Riyan Parag
Virat Kohli: 'विराटला गोलंदाजांनी वाचवलं, सामनावीर तो नव्हे...' T20 वर्ल्ड कप फायनलनंतर मांजरेकर कडाडले

परागने सांगितलं आहे की तो जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळेल, तेव्हा आसाममधील लोकांनाही मोठी स्वप्न पाहण्याचं बळ मिळेल. त्यानं सांगितलं की त्याला मोठं झाल्यानंतर त्याच्या भागातील लोक मोठी स्वप्न पाहण्यासाठी स्वत:ला थांबवत असल्याचं जाणवलं.

त्यामुळे तो जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळेल, तेव्हा त्यांनाही एक मार्ग मिळेल. तसेच त्याने सांगितलं की आयपीएलमध्ये खेळल्याने आसामसारख्या लहान राज्यातून असलात तरीही त्या पातळीपर्यंत पोहचू शकतो, हा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला आहे.

'आयपीएल इतके मोठे लक्ष्य नाही'

ईएसपीएनक्रिकइन्फोशी बोलताना तो पुढे म्हणाला, "परंतु आयपीएल इतके मोठे लक्ष्य असू शकत नाही. तुम्ही एक वर्ष खेळू शकता आणि नंतर गायब होऊ शकता.पण जेव्हा मी देशासाठी खेळेल, तेव्हा मला वाटते की खरा मार्ग तयार होईल. त्यांना माझी अनुसरण करण्याची गरज नाही, ते यासाठी स्वतःचा मार्गही तयार करू शकतात."

परागला आयपीएल 2024 च्या आधीच्या हंगामांमधील कामगिरीसाठी मोठ्या प्रमाणात टीकांचा सामना करावा लागला होता. पराग म्हणतो की तो सर्व ट्रोलिंगला पात्र नव्हता.

Riyan Parag
Team India to leave Barbados : जल्लोषाची तारीख ठरली! वर्ल्ड कपची ट्रॉफी 'या' दिवशी येणार भारतात, लागा तयारीला

'माणसे स्विचप्रमाणे बदलतात'

पराग म्हणाला, "हे सोपे नाही. गेल्या वर्षभरानंतर मी स्वत:शी संवाद साधला आणि या प्रकारचे पुनरागमन वैयक्तिक आहे. कारण मला अशा गोष्टी सहन कराव्या लागल्या, त्या खर तर माझासाठी बनला नव्हत्या.'

'कदाचित माझ्या तयारीत काही गोष्टींची कमतरता असेल, पण तरीही मला असे वाटले की मी एवढ्या ट्रोलिंगसाठी पात्र नव्हतो, पण मी काय करू शकतो? लोक काही न विचार करता बोलतच असतात. मागील वर्षी मी आयपीएल खेळणासाठी योग्य नव्हतो, पण आता त्यांना मी भारतीय संघात पाहिजे . म्हणून लोक स्विचप्रमाणे बदलतात."

भारताला झिम्बाब्वे दौऱ्यात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे.

Chitra smaran:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.