Gujarat Titans' Robin Minz accident : आयपीएल 2024 पूर्वी गुजरात टायटन्ससाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. खरंतर, संघाचा स्टार खेळाडू रॉबिन मिन्झचा अपघात झाला आहे. आयपीएल 2024 च्या मिनी लिलावात गुजरातने रॉबिनला 3.6 कोटी रुपये देऊन विकत घेतले होते. रॉबिन आयपीएलमध्ये विकला जाणारा पहिला आदिवासी खेळाडू आहे.
आयपीएल लिलावाद्वारे प्रसिद्धी मिळवणारा युवा क्रिकेटर रॉबिन मिन्झचा अपघात झाला आहे. हा २१ वर्षांचा खेळाडू बाईकवरून जात असताना त्याचा अपघात झाला. सध्या तो रुग्णालयात आहेत. मिन्झ त्याची कावासाकी सुपरबाईक चालवत असताना नियंत्रण सुटल्यानंतर दुसऱ्या बाईकला जाऊन धडकला. न्यूज 18 ने आपल्या रिपोर्टमध्ये लिहिले आहे की, त्याचे वडील फ्रान्सिस मिन्झ यांनी याची पुष्टी केली आहे.
मात्र, रॉबिनला फारशी दुखापत झाली नाही. त्याला किरकोळ दुखापत झाली असली तरी त्याच्या दुचाकीचे नुकसान झाले आहे. मिन्झची प्रकृती गंभीर नसून सध्या तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले. दुचाकीच्या पुढील भागाचे नुकसान झाले असून मिन्झच्या उजव्या गुडघ्याला किरकोळ दुखापत झाली आहे.
मिन्झचे वडील रांची विमानतळावर सुरक्षा रक्षक आहेत. त्यावेळी त्याचा एकदा सामना महेंद्रसिंग धोनीशी झाला होता. धोनीने मिन्झच्या वडिलांना वचन दिले होते की, जर आयपीएल 2024 च्या लिलावात रॉबिनला कोणीही खरेदी केले नाही तर चेन्नई सुपर किंग्ज त्याला खरेदी करेल.
लिलावात चेन्नई सुपर किंग्जने मिन्झसाठी बोली लावली. या फ्रँचायझीने बोली 1.20 कोटी रुपयांपर्यंत वाढवली पण नंतर ती सोडून दिली. नंतर मुंबई इंडियन्स, गुजरात आणि सनरायझर्स हैदराबादनेही रॉबिन मिन्झसाठी बोली लावली. शेवटी गुजरातने त्याला 3.60 कोटी रुपयांना विकत घेतले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.