Rohit Sharma : जय शाहांची पुन्हा भविष्यवाणी; म्हणाले, रोहित शर्मांच्या नेतृत्वात भारत WTC अन् चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकेल

Rohit Sharma : जय शाहांची पुन्हा भविष्यवाणी; म्हणाले, रोहित शर्मांच्या नेतृत्वात भारत WTC अन् चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकेल
Updated on

Team India : टीम इंडियानं 29 जून रोजी बार्बाडोसमध्ये T20 विश्वचषक 2024 चं विजेतेपद जिंकलं होतं, या विजयाची भविष्यवाणी काही महिन्यांपूर्वी राजकोटमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी केली होती. या मालिकेत आता जय शाह यांनी आणखी दोन अंदाज वर्तवले आहेत.

बीसीसीआयचे सचिव (BCCI Secretary) शहा म्हणाले, 'रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारत आगामी दोन आयसीसी ट्रॉफी - वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) आणि चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) जिंकेल.' 11 वर्षांचा दुष्काळ संपवून भारतानं T20 विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलं आहे. संघानं गेल्या १२ महिन्यांत तीन वेळा आयसीसी स्पर्धांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला, त्यापैकी दोन गमावले.

शेवटचा टी-20 विश्वचषक..

जय शाह यांनी टी 20 विश्वचषक 2024 चा विजय कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांना समर्पित केलाय. यांचा हा शेवटचा टी-२० विश्वचषक होता. प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडची ही शेवटची स्पर्धा होती. तर कोहली, रोहित आणि जडेजा यांनी विजेतेपद मिळवल्यानंतर या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतलीये.

Rohit Sharma : जय शाहांची पुन्हा भविष्यवाणी; म्हणाले, रोहित शर्मांच्या नेतृत्वात भारत WTC अन् चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकेल
गोरेगावमधील रहिवाशांना High Court चा मोठा दिलासा; 'या' भूखंडावरील अनधिकृत गाळे जमीनदोस्त करण्याचे निर्देश

टीम इंडियाचा हा ऐतिहासिक विजय

बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले, "या ऐतिहासिक विजयासाठी टीम इंडियाचं खूप खूप अभिनंदन. मला हा विजय प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांना समर्पित करायचा आहे. गेल्या एका वर्षात हा विजय आमचा होता. तिसरी फायनल आम्ही 2023 च्या डब्ल्यूटीसी फायनलमध्ये जिंकू शकलो नाही, पण मी राजकोटमध्ये सांगितलं होतं की, आम्ही चषक जिंकू आणि आमच्या कर्णधारानं तिथं झेंडा फडकवला."

'शेवटच्या 5 षटकांत सामना फिरला'

जय शाह यांनी शेवटच्या 5 षटकांमध्ये सामना फिरवल्याबद्दल जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंगसह सूर्यकुमार यादव यांचेही आभार मानले. शेवटच्या 5 षटकांत दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी फक्त 30 धावांची गरज होती, त्यानंतर या तीन भारतीय गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजी करत विरोधी संघावर दबाव आणला. हार्दिक पांड्यानं क्लासेन आणि डेव्हिड मिलरचे महत्त्वाचे बळी घेतले, तर सूर्यकुमार यादवनं शेवटच्या षटकात अप्रतिम झेल घेतला, याचंही त्यांनी कौतुक केलं.

'दोन्ही स्पर्धांमध्ये चॅम्पियन बनू'

आगामी आयसीसी स्पर्धेबाबत बीसीसीआय सचिव म्हणाले, "या विजयानंतर पुढचा टप्पा डब्ल्यूटीसी फायनल आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचा आहे, मला पूर्ण विश्वास आहे की रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आम्ही या दोन्ही स्पर्धांमध्ये चॅम्पियन बनू असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.