Rohit Sharma: काय थांबा? रोहितचं पॅपराजींना मराठीत उत्तर, हिटमॅन म्हणताच चेहऱ्यावरही खुललं हास्य; Video Viral

Rohit Sharma Marathi Response to Paparazzi: रोहित शर्मा पॅपराझींना मराठीत उत्तर देतानाचा त्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
Rohit Sharma Viral Video
Rohit Sharma Viral VideoSakal
Updated on

Rohit Sharma Viral Video: भारताचा कर्णधार रोहित शर्मा त्याच्या आक्रमक फलंदाजीबरोबरच त्याच्या गमतीशीर स्वभावासाठी ओळखला जातो. त्याचे अनेक मजेशीर व्हिडिओही व्हायरल होत असतात. त्याचा नुकताच असाच एक व्हि़डिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तो मराठीत उत्तर देताना दिसत आहे.

नागपूरमध्ये जन्मलेल्या आणि मुंबईत लहानाचा मोठा झाला असल्याने रोहितला मराठीही चांगले बोलता येते. या व्हिडिओमध्ये दिसते की रोहित आणि त्याची पत्नी कुठेतरी निघाले असताना पॅपराजींकडून त्याला फोटो काढण्यासाठी थांबण्याची विनंती केली जात आहे.

यावेळी ते रोहितला थांबा, थांबा असं मराठीतून बोलताना दिसत आहेत. त्यावर रोहितही त्यांना मराठीतच 'काय थांबा', असं म्हणतानाही दिसत आहे. त्यावेळी मागून त्याला हिटमॅन असाही आवाज देताना ऐकू येत आहे. ते ऐकून रोहितच्या चेहऱ्यावर हास्य फुलल्याचे दिसत आहे. पण त्याचा हा व्हिडिओ नक्की कधीचा आहे आणि कुठला आहे, हे स्पष्ट झालेले नाही.

Rohit Sharma Viral Video
'गौतम गंभीर कसा माणूस हे माहित आहे...' Rohit Sharma बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर काय म्हणाला?

दरम्यान, रोहितने नुकतेच कर्जत-जामखेडे येथे होणाऱ्या भव्य स्टेडियमच्या भूमीपुजनासाठी हजेरी लावली होती. तो कर्जत-जामखेड येथे त्याची अकॅडमीही सुरु करणार आहे. दरम्यान, यावेळी रोहितने तिथे जमलेल्या चाहत्यांशी मराठीत संवादही साधला.

रोहितने यावेळी २०२४ टी२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जीवात जीव आला, असंही म्हटलं. दरम्यान, रोहित नुकताच बांगालदेशविरुद्ध कसोटी मालिकेत खेळला आहे. त्याला या मालिकेत वैयक्तिक फारशी चांगली कामगिरी करता आली नसली, तरी त्याच्या नेतृत्वाखाली भारताने मालिकेत २-० असा विजय मिळवला.

तो आता १६ ऑक्टोबरपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहे. ही मालिकाही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा भाग असल्याने भारतासाठी महत्त्वाची आहे.

Rohit Sharma Viral Video
कसं काय, कर्जत-जामखेडकरांनो! Rohit Sharma ची मराठीत 'बोलं'दाजी; वर्ल्ड कप विजयाची आठवण

रोहितने घेतलीये T20I मधून निवृत्ती

रोहितने टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळे तो त्यानंतर भारताकडून टी२० खेळताना दिसला नाही.

त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये १५९ सामने खेळताना ५ शतकांसह ४२३१ धावा केल्या आहेत. तो १५० हून अधिक आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणारा पहिला खेळाडू आहे. तसेच सध्या आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.