Womens T-20 world cup स्पर्धेपूर्वी रोहित शर्माने घेतली भारतीय खेळाडूंची भेट, हरमनप्रीत, स्मृती, जेमिमासोबतचा Video Viral

Indian Womens Team: ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील दोन्ही सराव सामने जिंकून भारतीय संघ न्युझीलंडविरूद्ध पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
rohit sharma with indian womens team
rohit sharma with indian womens teamesakal
Updated on

Rohit sharma meets Indian Womens Team: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ भारताने जिंकला. कालपासून (३ ऑक्टोबर) महिलांच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपला सुरूवात झाली असून आज भारताचा न्युझीलंडविरूद्ध पहिला सामना आहे. भारताच्या सामन्याआधी वर्ल्ड कप विजेता कर्णधार रोहित शर्माने महिला संघाची भेट घेतली व शुभेच्छा दिल्या आहेत.

महिलांचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संयुक्त अरब अमिराती (UAE)येथे होणार आहे. कालच्या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेवर ३१ धावांनी विजय मिळवला. तर स्पर्धेतील दोन्ही सराव सामने जिंकल्यावर भारत संघ न्युझीलंडविरूद्ध आपला पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.

rohit sharma with indian womens team
Women's T20 World Cup स्पर्धेचा सुरू होतोय रोमांच; कधी, कुठे अन् कसे पाहाणार सामने, जाणून घ्या एका क्लिकवर

ट्वेंटी-२० वर्ल्ड कपआधी भारतीय महिला संघाला शुभेच्छा देण्यासाठी भारतीय कर्णधार राहित शर्मा युएई(UAE)मध्ये पोहचला आहे. त्याचा महिला संघासोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राहित शर्मा महिला खेळाडूंना शुभेच्छा देताना व मार्गदर्शन करताना पहायला मिळत आहे.

भारतीय संघ

हरमनप्रीत कौर ( कर्णधार), स्मृती मानधना ( उप कर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रीग्ज, रिचा घोष ( यष्टिरक्षक), यास्तिका भाटीया ( यष्टिरक्षक), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग, दयालन हेमलथा, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, संजना संजीवन

राखीव खेळाडू - उमा चेत्री, तनुजा कनवर, सैमा ठाकोर

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ मधील भारताचा विजय

एकही सामना न गमवता भारतीय पुरूष संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४मध्ये विजय मिळवला. त्याआधी भारतामध्ये झालेल्या वन-डे वर्ल्ड कपमध्येही भारताने एकही सामना गमवला नव्हता. परंतु अहमदाबाद येथे झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रिलियाने भारताला पराभूत केले आणि ट्रॉफी आपल्या नावे केली. परंतु त्यानंतर झालेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप मध्ये भारताने त्याच वर्चस्वाने कप जिंकला. भारताने २००७ नंतर १७ वर्षांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कपवर भारताचे नाव कोरल्यामुळे हा विजय विशेष मानला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.