India vs Bangladesh 1st test: भारत विरुद्ध बांग्लादेश संघात १९ सप्टेंबरपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नईला सुरू होणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धचाही भाग आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची आहे.
दरम्यान, भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचे आगमी हंगामात १० कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यामुळे त्यादृष्टीने भारताला गोलंदाजांनाही योग्यरितीने हाताळावे लागणार आहे. याबाबतच चेन्नई कसोटीपूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्माने भाष्य केले आहे.
आगामी काळात मोहम्मद शमीचेही दुखापतीनंतर पुनरागमन होऊ शकते. तसेच जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्यावरही प्रामुख्याने वेगवान गोलंदाजीची मदार असणार आहे.
फिरकी गोलंदाजीची जबाबदारी आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्यावर असणार आहे. या सर्व गोलंदाजांना दुखापत होणार नाही, याची काळजीही भारतीय संघाला घ्यावं लागणार आहे.