Rohit Sharma चा बांगलादेशविरुद्ध जर दिसला 'हिटमॅन' अवतार, तर रचणार तीन मोठे रेकॉर्ड

Rohit Sharma Chases Three Milestones during IND vs BAN Test: भारताचा कर्णधार रोहित शर्माला बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेदरम्यान तीन मोठे विक्रम करण्याची संधी असणार आहे.
Rohit Sharma
Rohit SharmaSakal
Updated on

Rohit Sharma Records: भारतीय क्रिकेट संघाला १९ सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नईमध्ये एमए चिंदबरम स्टेडियमवर (चेपॉक) खेळवला जाणार आहे.

त्यानंतर २७ सप्टेंबपासून कानपूरला दुसरा सामना सुरू होईल. या मालिकेदरम्यान, भारताचा कर्णधार रोहित शर्माला तीन मोठे विक्रम करण्याची संधी असणार आहे.

दरम्यान, रोहितची आत्तापर्यंत कसोटीत बांगलादेशविरुद्धची कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. रोहितने आत्तापर्यंत बांगलादेशविरुद्ध फक्त तीन कसोटी सामनेच खेळले आहेत. यातही त्याला ३३ धावाच करता आल्या आहेत. पण यंदा त्याने जर शानदार कामगिरी केली, तर तो मोठे विक्रम करू शकतो.

Rohit Sharma
Rohit Sharma Press Conference : सब टीम को इंडिया को हराना है! मजा लेने दो उन्हे; रोहितने घेतली बांगलादेशची फिरकी, Video

सेहवागला मागे टाकण्याची संधी

रोहितने सध्या कसोटीत ५९ सामन्यांमध्ये ८४ षटकार मारले आहेत. त्यामुळे रोहितने जर बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत ७ किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारले, तर तो भारताकडून सर्वाधिक कसोटी षटकार मारण्याच्या यादीत अव्वल क्रमांकावर येईल. तो या यादीत विरेंद्र सेहवागला मागे टाकेल. सध्या या यादीत ९१ षटकारांसह अव्वल क्रमांकावर विरेंद्र सेहवाग आहे.

तसेच जर रोहितने १६ किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारले, तर तो कसोटीत १०० षटकार पूर्ण करेल. जर त्याने १६ षटकार मारले, तर तो हा कारनामा करणारा बेन स्टोक्स (१३१ षटकार), ब्रेंडन मॅक्युलम (१०७ षटकार) आणि ऍडम गिलख्रिस्ट (१०० षटकार) यांच्यानंतरचा चौथाच खेळाडू ठरेल.

Rohit Sharma
Rohit Sharma: 'सर्फराज, जैस्वास, जुरेल निर्भीड, तर गंभीरचा कोचिंग स्टाफ द्रविडपेक्षा वेगळा...' चेन्नई कसोटीपूर्वी रोहितने स्पष्टच सांगितलं

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये १० शतके करण्याची संधी

भारत आणि बांगलादेश संघात होत असलेली कसोटी मालिका ही वर्ल़्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेचाही भाग आहे. त्यामुळे जर या मालिकेत रोहितने एक जरी शतक केले, तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेमध्ये १० शतके पूर्ण करेल.

असा पराक्रम करणारा तो भारताचा पहिलाच खेळाडू ठरेल, तर एकूण चौथा खेळाडू ठरेल. यापूर्वी जो रुट (१६), मार्नस लॅब्युशेन (११) आणि केन विलियम्सन (१०) यांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये १० पेक्षा अधिक शतके केली आहेत.

सचिन-विराटच्या पंक्तीत बसण्याची संधी

रोहितने जर या मालिकेत २ किंवा त्यापेक्षा अधिक शतके केली, तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० शतके पूर्ण करेल. त्याने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४८ शतके केली आहेत.

त्यामुळे जर त्याने ५० शतके केली, तर तो सचिन तेंडुलकर (१०० शतके) आणि विराट कोहली (८० शतके) यांच्यानंतर ५० आंतरराष्ट्रीय शतके करणारा भारताचा तिसराच खेळाडू ठरेल. तसेच एकूण १० वा खेळाडू ठरेल.

तसेच रोहितने सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १९२३४ धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याने अजून २६६ धावा केल्या, तर तो १९५०० धावा करणारा १५ वा खेळाडू ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.