Rohit Sharma बेस्ट ओपनर! ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडून वाहवाह; स्मिथ-हेझलवूडसह अनेकांच्या World XI मध्ये स्थान

Australian Cricketers Picked Rohit Sharma in World XI: ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी रोहित शर्माचं भरभरून कौतुक केलं असून त्याची World XI साठीही निवड केली आहे.
Rohit Sharma
Rohit SharmaSakal
Updated on

Rohit Sharma: भारतीय संघ पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारताला बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ही कसोटी मालिका खेळायची असून यासाठी चाहत्यांमध्येही उत्सुकता आहे. या बहुप्रतिक्षित मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या काही स्टार खेळाडूंनी त्यांच्या वर्ल्ड इलेव्हनमध्ये सलमीवीर म्हणून कोणाला घ्यायला आवडेल, यावर मत मांडलं आहे.

विशेष म्हणजे या जागेसाठी त्यांनी भारताच्या रोहित शर्माची निवड केली आहे. रोहितची निवड मार्नस लॅब्युशेन, स्टीव्ह स्मिथ, नॅथन लायन, जोश हेजलवूड, उस्मान ख्वाजा यांनी केली आहे. यावेळी त्यांनी रोहितच्या प्रतिभेचे तोंडभरून कौतुकही केले आहे. याचा व्हिडिओ फॉक्स क्रिकेटने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की लॅब्युशेन म्हणत आहे की 'रोहितला दुसऱ्या क्रमांकासाठी निवडेल. तो ऊर्जा निर्माण करतो आणि प्रतिस्पर्ध्यांवर दबाव टाकण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. तो सामन्याला पुढे घेऊन जाऊ शकतो.'

Rohit Sharma
Video : '१२ साल मे एक बार allowed है...'! पराभवानंतर Rohit Sharma चं विधान अन् नेटकऱ्यांकडून जोरदार धुलाई
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.